चन्ना येथे लसीकरणाला वाढता प्रतिसाद ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:28 AM2021-05-01T04:28:01+5:302021-05-01T04:28:01+5:30
बोंडगावदेवी : कोरोना संक्रमणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेेता, सामान्य जनतेनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. हिम्मत व धैर्याने आलेल्या परिस्थतीचा ...
बोंडगावदेवी : कोरोना संक्रमणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेेता, सामान्य जनतेनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. हिम्मत व धैर्याने आलेल्या परिस्थतीचा सामना करावा. कोरोनावर आळा घालण्यासाठी आरोग्य केंद्रात लस उपलब्ध झाली आहे. समस्त जनतेनी कुणाच्या अप्रचारास बळी पडू नका. प्रतिबंधात्मक लस घेतल्याने स्वत:ची प्रतिकार शक्ती वाढते. ग्रामीण भागातील सामान्य जनतेनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी पुढे यावे असे तालुका सहायक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी प्रशांत गाडे यांनी म्हटले आहे.
चान्ना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोव्हॅक्सीन लसीकरण करुन घेतल्यानंतर उपस्थित जनतेशी हितगुज साधताना ते बोलत होते. गुरुवारला (दि.२९) प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहिम राबविण्यात आली. डॉ. कुंदन कुलसुंगे, आरोग्य सेविका सीमा जगनाडे, आरोग्य सेवक विजय शेंडे, रवि दोनोडे यांच्या पथकाने लसीकरण मोहीम राबवून परिसरातील ३० जणांनी लस घेतली. याप्रसंगी उपस्थितांशी हितगूज साधताना प्रशांत गाडे म्हणाले की, प्रतिबंधात्मक लस आरोग्याच्या हिताची आहे. लस घेतल्याने आपल्यातील आंतरिक शक्ती वाढते. कोणतीही भिती बाळगू नका. कोरोनाला पळविण्यासाठी प्रतिबंधात्मक लस अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले.