निमगाव येथे लसीकरणाला वाढता प्रतिसाद ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:20 AM2021-06-20T04:20:24+5:302021-06-20T04:20:24+5:30

बोंडगावदेवी : गाव कोरोनामुक्त करण्यासाठी समस्त ग्रामवासीयांना सजग राहणे गरजेचे आहे. संभाव्य तिसऱ्या टप्प्यापासून सतर्क राहण्यासाठी ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगावी. ...

Increasing response to vaccination at Nimgaon () | निमगाव येथे लसीकरणाला वाढता प्रतिसाद ()

निमगाव येथे लसीकरणाला वाढता प्रतिसाद ()

Next

बोंडगावदेवी : गाव कोरोनामुक्त करण्यासाठी समस्त ग्रामवासीयांना सजग राहणे गरजेचे आहे. संभाव्य तिसऱ्या टप्प्यापासून सतर्क राहण्यासाठी ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगावी. गावात कोरोनाचा शिरकाव होणार नाही याची खबरदारी घेणे ही सर्वांची सामुदायिक जवाबदारी आहे. आपल्यातील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी प्रतिबंधात्मक लसीकरण बिनधास्तपणे करुन घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी श्वेता कुलकर्णी (डोंगरवार) यांनी केले.

ग्रामपंचायत कार्यालय निमगाव येथे आयोजित लसीकरण शिबिर प्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी सरपंच विश्वनाथ बाळबुद्धे, बँक व्यवस्थापक संजय सेलूकर, पत्रकार अमरचंद ठवरे, सामुदायिक आरोग्य अधिकारी आरती काळे, मुख्याध्यापक ब्राम्हणकर, आरोग्य सेविका शहारे, ग्रामसेवक संतोष परमार उपस्थित होते. आरोग्य विभागाच्या वतीने निमगाव येथे कोव्हॅक्सिन, कोविडशिल्ड लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात आली होती. ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामस्थांसाठी बैठक व्यवस्था करुन ध्वनीक्षेपणाच्या माध्यमातून गावकऱ्यांना लस घेण्यासाठी वारंवार प्रवृत्त करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ग्रामपंचायतने केलेल्या आवाहनानुसार समस्त ग्रामस्थांनी लसीकरणाला वाढता प्रतिसाद दिला. सामान्य जनता मोठ्या उत्स्फूर्तपणे लस घेण्यासाठी येत होती. लसीकरण अभियानाच्या आयोजनासाठी सरपंच विश्वनाथ बाळबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर राऊत, प्रियंका गोबाडे, घनश्याम उरुकुडे, जि.प. प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: Increasing response to vaccination at Nimgaon ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.