अपक्ष उमेदवार ठरविणार इसापूर ग्रा.पं.ची सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:26 AM2021-01-21T04:26:40+5:302021-01-21T04:26:40+5:30
इसापूर : नुकताच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इसापूर ग्रामपंचायतच्या एकूण सात जागांवर दोन वेगवेगळ्या पॅनलचे प्रत्येकी ...
इसापूर : नुकताच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इसापूर ग्रामपंचायतच्या एकूण सात जागांवर दोन वेगवेगळ्या पॅनलचे प्रत्येकी तीन-तीन उमेदवार विजयी झाले, तर एक अपक्ष उमेदवार निवडून आला. त्यामुळे इसापूर ग्रामपंचायतवर सत्ता स्थापन करण्यासाठी अपक्ष उमेदवाराची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या अपक्ष उमेदवाराच कल ज्या पॅनलकडे जाईल, त्या पॅनलची सत्ता स्थापन होईल, हे स्पष्ट झाले आहे.
इसापूर ग्रामपंचायत ही सात सदस्य असून, भाजप समर्थित तीन उमेदवार तर ग्रामविकास पॅनलचे तीन उमेदवार निवडून आले, तर एक अपक्ष सदस्य निवडून आला. त्यामुळे ग्रामपंचायतवर सत्ता स्थापनेचा दावा करणार कोण, अशी चर्चा आहे. येत्या सात आठ दिवसांत सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. त्यानंतर, ग्रामपंचायतींच्या सत्तेच्या समीकरणाचे चित्र स्पष्ट होणार आहे. इसापूर येथील जनतेनी दोन्ही पॅनलला समान कौल देऊन एक अपक्ष उमेदवाराला निवडून देत, सत्तेच्या समीकरणाची सूत्रे अपक्ष उमेदवाराच्या हाती दिली आहे. त्यामुळे येथील सत्ता स्थापनेच्या घडामोंडीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यामुळे अपक्ष निवडून आलेल्या कल्पना करंबे या आपला पाठिंबा नेमक्या कोणत्या पॅनलला देतात, याकडे सर्व गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.