‘ग्राम उदय से भारत उदय’ अभियान
By Admin | Published: April 17, 2016 01:43 AM2016-04-17T01:43:56+5:302016-04-17T01:43:56+5:30
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून राष्ट्रीय पंचायत दिनापर्यंतच्या कालावधीत....
इटखेडा : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून राष्ट्रीय पंचायत दिनापर्यंतच्या कालावधीत भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालय व महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागांतर्गत राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये १४ एप्रिल ते २४ एप्रिल २००६ पर्यंत ‘ग्राम उदय से भारत उदय’ कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने येथील ग्रामपंचायत कार्यालयात या अभियानाचा शुभारंभ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पमाला अर्पण व अभिवादन करुन करण्यात आला.
सरपंच अस्मिता वैद्य यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सभापती उमाकांत ढेंगे, माजी सरपंच इंद्रदास झिलपे, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सुभाष देशमुख, पोलीस पाटील विकास लांडगे, ज्येष्ठ नागरीक विश्वनाथ गोठे, प्राचार्य पुंडलिक धोटे यांची उपस्थिती होती. ग्राम विकास अधिकारी मेश्राम यांनी या अभियानाची पार्श्वभूमी उपस्थितांना समजावून सांगितली. या निमित्याने उपस्थितांनी सामाजिक एकोपा वृद्धिंगत करण्याच्या अनुषंगाने सामाजिक समता राखण्याची शपथ घेतली. या अभियानांतर्गत सामाजिक सलोखा वा अभिसरण कार्यक्रम, ग्राम किसान सभा, आदिवासी महिला सरपंच मेळावा, ग्रामसभेचे आयोजन व ग्रामसभेस पंतप्रधानांचे संबोधन ऐकविणे इत्यादी कार्यवाही अपेक्षित आहे. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य कुंता कोकोडे, सुशिला गोंडाणे, सदस्य चेतन शेंडे, सरिता सुखदेवे, तारा वैद्य, पुष्पा उके, सुषमा गोंडाणे, संगीता गोंडाणे, देवराम मडावी, विनोद ठाकूर, घनशाम गोठे, शोभा मडावी यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
विजेचा लपंडाव
सडक अर्जुनी : सडक अर्जुनी, कोहमारा, वडेगाव, कोकणा/जमि., सौंदड परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. रात्रीला वीज जाणे आता नित्याचीच बाब बनली आहे. लहान मुले व वयोवृद्ध व्यक्तींना या विजेच्या लपंडावाचा जास्त त्रास सहन करावा लागत आहे. (शहर प्रतिनिधी)