टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची कामगिरी उत्कृष्ट राहील ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:18 AM2021-07-22T04:18:45+5:302021-07-22T04:18:45+5:30

गोंदिया : ऑलिम्पिक स्पर्धा जपान देशात टोकियो या शहरात २३ जुलै ते ५ सप्टेंबर या कालावधीत होत आहेत. या ...

India to perform well at Tokyo Olympics () | टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची कामगिरी उत्कृष्ट राहील ()

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची कामगिरी उत्कृष्ट राहील ()

Next

गोंदिया : ऑलिम्पिक स्पर्धा जपान देशात टोकियो या शहरात २३ जुलै ते ५ सप्टेंबर या कालावधीत होत आहेत. या स्पर्धेत राज्यातून १० व संपूर्ण देशातून २२८ खेळाडू व ऑफिशियलचे पथक सहभागी होणार आहे. यामुळे आता टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची कामगिरी उत्कृष्ट राहील व जास्तीत जास्त पदके भारताला प्राप्त

होतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले.

टोकिओ ऑलिम्पिक-२०२१ मध्ये १० भारतीय खेळाडूंची निवड झाल्याबद्दल मंगळवारी (दि.२१) नवीन प्रशासकीय इमारत येथे १० खेळाडूंच्या फ्लेक्सच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी टोकियो ऑलिम्पिक-२०२१ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची भेट घेऊन गुंडे यांनी त्यांचे कौतुक केले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, नगर परिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजकुमार हिवारे, जिल्हा खनिकर्म अधिकारी सचिन वाढवे, कोषागार अधिकारी एल.एच. बाविस्कर, पोलीस निरीक्षक उद्धव दमाळे, अपर तहसीलदार अनिल खडतकर, क्रीडा अधिकारी ए.बी. मरस्कोल्हे, तालुका क्रीडा अधिकारी राजेंद्र शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते.

संचालन क्रीडा अधिकारी मरस्कोल्हे यांनी केले. आभार जिल्हा क्रीडा अधिकारी राठोड यांनी मानले. कार्यक्रमाला शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त राजेश राऊत, प्रशिक्षक नाजूक उईके, विशाल ठाकूर, धनंजय भारसाकळे, दीपक सिक्का, मनीषा तराळे, विनेश फुंडे व जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे व्हॉलीबॉल खेळाडू उपस्थित होते.

------------------------------

गुंडे यांनी खेळाडूंसोबत घेतला सेल्फी

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत राही सरनोबत (पिस्तूल शूटिंग २५ मीटर), चिराग शेट्टी (बॅडमिंटन पुरुष दुहेरी), तेजस्विनी सावंत (५० मीटर रायफल शूटिंग), अविनाश साबळे (ॲथलेटिक्स ३००० मीटर), प्रवीण जाधव (आर्चरी रिकर्व्ह), विष्णू सरवानन (सेलिंग लेसर स्टँडर्ड क्लास), स्वरूप उन्हाळकर (पॅरा शूटिंग १० मीटर रायफल), सुयश जाधव (पॅरा स्विमिंग ५० मीटर बटर फ्लाय, २०० मीटर वैयक्तिक), उदयन माने (गोल्फ), भाग्यश्री जाधव (पॅरा ॲथलेटिक्स) यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी सेल्फी काढले, तसेच खेळाडूंच्या पांढऱ्या फ्लेक्सवर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या.

Web Title: India to perform well at Tokyo Olympics ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.