भारतातील संस्कृती जगाहून वेगळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 08:43 PM2018-01-09T20:43:05+5:302018-01-09T20:43:26+5:30
भारतात गंगा-जमुना यांचा गौरवशाली इतिहास आहे. विविध जाती धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने नांदतात.
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : भारतात गंगा-जमुना यांचा गौरवशाली इतिहास आहे. विविध जाती धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने नांदतात. दिवाळी ज्या आनंदात येथे साजरी केली जाते, त्याच आनंदात ईद साजरी केली जाते. यामुळेच भारतातील संस्कृती जगाहून वेगळी असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे युवा नेते विशाल अग्रवाल यांनी केले. तालुक्यातील ग्राम दासगाव बु. येथील मिलाप उर्स कमिटीच्यावतीने हजरत बाबा बुरखाशाह रहतुल्लाह अलैह यांच्या उर्स निमित्त आयोजीत दुय्यम कव्वाली मुकाबल्याच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रानू नशिने उपस्थित होत्या.
विशेष म्हणजे, उर्स निमित्त वाराणसी येथील कव्वाल छोटा अशोक जखमी व ग्वालीयर येथील कव्वाल नुसरत अली ईशाद इंकार यांच्या दुय्यम कव्वाली मुकाबल्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला नगरसेवक शकील मंसुरी, प्रकाश रहमतकर, रजनी गौतम, अपूर्व अग्रवाल, पुरूषोत्तम मोदी, खालीद पठाण, सुनील तिवारी, विद्या भालाधरे, माया कोल्हे, गोविंद तुरकर, मनोज कोल्हे, हिरामन डहाट, संगीता रहांगडाले, सपन सुर्यवंशी, नमिता सहारे, धुर्वराज उके, नाजीर हुसेन, मनोज कटकवार, अशपाक खान, राजू गौतम, कय्युम शेख, गुलाम शेख, हुसैन शेख, कादर शेख, मेहफुज सय्यद, जमीन कुरेशी, मोईनुद्दीन शेख, अस्से शेख, फिरोज शेख, संजय क्षीरसागर, दुर्योधनसिंह मारे, सचिन रहांगडाले, नवाज शेख, इशात तुरक, अमीन शेख, इमरान शेख, मनोहर वालदे यांच्यासह आयोजन समिती पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते.