भारतीय खेळाडूंमध्ये भरपूर क्षमता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 12:23 AM2018-12-06T00:23:58+5:302018-12-06T00:24:57+5:30
क्रिकेट हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. विविध देशांमध्ये या खेळावर प्रेम करणाऱ्या क्रिकेट प्रेमींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. भारतात सुध्दा क्रिकेट प्रेमींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. भारतीय खेळाडूंनी विश्वकप जिंकून या खेळाला अधिक उंचीवर नेण्याचे काम केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : क्रिकेट हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. विविध देशांमध्ये या खेळावर प्रेम करणाऱ्या क्रिकेट प्रेमींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. भारतात सुध्दा क्रिकेट प्रेमींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. भारतीय खेळाडूंनी विश्वकप जिंकून या खेळाला अधिक उंचीवर नेण्याचे काम केले आहे. भारतीय खेळांडूमध्ये भरपूर क्षमता असून त्यांना केवळ योग्य संधी मिळण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आ. गोपालदास अग्रवाल यांनी येथे केले.
युवा संकल्प बहुउद्देशिय विकास संस्थेतर्फे येथील सर्कस मैदानावर रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटना प्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या वेळी माजी न.प.उपाध्यक्ष राकेश ठाकूर, संस्था अध्यक्ष सचिन ठाकूर, नगरसेवक क्रांती जायस्वाल, उपाध्यक्ष मदन उपाध्याय, सचिव बंटी ठाकूर, मिक्की अग्रवाल, योगी खंडेलवाल, गुरूप्रितसिंग गुरूदत्ता, आकाश पुरोहीत, नवीन जोशी, बाबु गुप्ता, प्रथम माधवानी, गौरव अग्रवाल, राजा जयस्वाल, बंटी सोमवंशी, रसीद सोलंकी, रोमी ठाकूर, अस्सु शर्मा, अमित श्रीवास्तव, कालु शर्मा उपस्थित होते.
अग्रवाल म्हणाले, युवा संकल्प बहुउद्देशिय विकास संस्था मागील अनेक वर्षांपासून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करुन ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहान देण्याचे काम करीत आहे.
खेळाडूंना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध होवून त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकास व्हावा यासाठी गोंदिया येथे भव्य क्रीडा संकुल तयार करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील खेळाडूंना दर्जेदार क्रीडा विषयक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्तविक सचिन ठाकूर यांनी मांडले, संचालन व आभार अपूर्व अग्रवाल यांनी मानले.