इंदिरा गांधींनी आरोग्य सेवा बळकट केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:43 AM2017-11-24T00:43:30+5:302017-11-24T00:44:52+5:30
येथील बीजीडब्ल्यू व केटीएस रूग्णालयापासून ते देशातील मोठे रूग्णालय हे इंदिरा गांधींचे देश व देशवासीयांप्रती समर्पण व आपुलकीचे प्रतीक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील बीजीडब्ल्यू व केटीएस रूग्णालयापासून ते देशातील मोठे रूग्णालय हे इंदिरा गांधींचे देश व देशवासीयांप्रती समर्पण व आपुलकीचे प्रतीक आहे. त्यांच्याच कार्यकाळात २० कलमी योजनांसारख्या अनेक विकास प्रकल्पांची सुरूवात झाली होती. यात आरोग्यविषयक सुविधांकडे त्यांचा विशेष कल होता. इंदिरा गांधींनीच देशातील आरोग्य सुविधा बळकट केल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
युवक कॉंग्रेस व एनएसयुआय यांच्यावतीने इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी उत्सवानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजीत रक्तदान शिबिर कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. शिबिराला महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. वी. पी. रूखमोडे, बीजीडब्यू रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजीव दोडके, डॉ. बी. कोबे, डॉ. नंदकिशोर जायस्वाल, डॉ. सुवर्णा हुबेकर, डॉ. पी. कांबळे, डॉ. स्मिता गेडाम, आम्रपाली आल्टे, राजू रहांगडाले प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी रूखमोडे यांनी, रक्तदान एक रचनात्मक कार्य असून ज्यापासून कुणाचा जीव वाचवित येऊ शकतो. रक्त दान स्वरूपातूनच मिळू शकते. ते तयार करता किंवा विकता येत नाही. न् त्यामुळेच रक्तदान महानदान मानले जात असल्याचे मत व्यक्त केले. उपस्थित अन्यमान्यवरांनी या वेळी मार्गदर्शन केले. प्रास्तावीक संयोजक अपूर्व अग्रवाल यांनी केले. संचालन डॉ. एस.लोहीत यांनी केले. आभार डॉ. दोडके यांनी मानले. शिबिरासाठी शकील मंसूरी, संदीप ठाकूर, पृथ्वीपालसिंह गुलाटी, सुनील तिवारी, भागवत मेश्राम, व्यंकट पाथरू, योजना कोतवाल, अजय गौर, सौरभ शर्मा, कमल छापरिया, देवा रूसे, छाया मेश्राम, विणा पारधी, सुशील रहांगडाले, राजू लिमये, दिल्लू गुप्ता, सुशील ठवरे, दिपल अग्रवाल, शैलेश जायस्वाल, अनील सहारे, अमर रंगारी, रूकसाना पठाण, आनंद राहूलकर, यशपाल डोंगरे, महेश हरिणखेडे, मानसी तरवरे यांनी सहकार्य केले.