इंदिरा गांधींचे जीवनच एक संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 09:54 PM2017-11-20T21:54:19+5:302017-11-20T21:54:57+5:30
लहानपासूनच नेतृत्व गुणांना आत्मसात करून स्वातंत्र्याच्या युद्धात इंदिरा गांधींनी भाग घेतला.
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : लहानपासूनच नेतृत्व गुणांना आत्मसात करून स्वातंत्र्याच्या युद्धात इंदिरा गांधींनी भाग घेतला. पाकिस्तानातून बांगला देश वेगळा करून स्वतंत्र देशाचा दर्जाचा मिळवून दिला. हुकूमशहासारखे शासन न करता त्यांनी लोकशाहीचा पाय भक्कम केला. आयर्न लेडीची ओळख असलेल्या इंदिरा गांधी यांनी देशासाठी जीवन अर्पण केले असून त्यांचे जीवनच एक संदेश असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
इंदिरा गांधी जन्मशताद्बी उत्सव समितीच्यावतीने जिल्ह्याच्या भ्रमणावर निघालेल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्मृती यात्रेच्या समारोप समारंभानिमित्त रविवारी येथील गांधी प्रतिमा चौकात आयोजित सभेत ते बोलत होते. यात्रेचे युवक कॉंग्रेस, एनएसयुआय व कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी युवा नेता विशाल अग्रवाल, युवक काँग्रेस अध्यक्ष संदीप ठाकूर, एनएसयुआय अध्यक्ष संदीप रहांगडाले, शहर युवक अध्यक्ष नफीस सिद्धीकी यांच्या नेतृत्वात अदासी-तांडा येथे स्वागत करून मोटारसायकल रॅली काढून जयस्तंभ चौकात आणले. त्यानंतर आमदार अग्रवाल यांच्या नेतृत्वात रॅली काढून शहराचे भ्रमण करीत रॅली सभा स्थळी पोहोचली.
सभेत कॉंग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे यांनी, इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात भारताच्या विकासाची नवी कथा लिहिण्यात आली. पंडीत नेहरूंनी बनविलेल्या धोरणांना पुढे लागू करून त्यांनी ग्रामीण भागाच्या विकासाला गती दिली.त्यांनी घेतलेल्या पराक्रमी पवित्र्यामुळेच अमेरिकेसारखा शक्तीशाली देश त्यांना घाबरत असल्याचे सांगीतले. जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांनी, इंदिरा गांधी यांची आजही देश आठवण करीत असून त्यांचा सारखा पंतप्रधान देशाला अद्यापही मिळाला नसल्याचे मत व्यक्त केले.
प्रास्ताविक जिल्हा परिषद सभापती पी.जी.कटरे यांनी केले. संचालन शहर महासचिव व उत्सव समिती संयोजक अपूर्व अग्रवाल यांनी केले. आभार जिल्हा महासचिव अमर वराडे यांनी मानले.
कार्यक्रमाला माजी आमदार रामरतन राऊत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, प्रदेश सचिव विनोद जैन, डॉ. योगेंद्र भगत, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. झामसिंग बघेले, राधेलाल पटले, डॉ.नामदेव किरसान, महिला अध्यक्ष उषा सहारे, अनिल गौतम, महासचिव अशोक लंजे, सहेसराम कोरोटे, शेषराव गिरेपुंजे, राजेश नंदागवळी, पृथ्वीपालसिंह गुलाटी, राकेश ठाकूर, शकील मंसूरी, भागवत नाकाडे, डेमेंद्र रहांगडाले, विशाल शेंडे, रत्नदीप दहिवले यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार
इंदिरा गांधी जन्मशताब्दी उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध, भाषण व चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा याप्रसंगी आमदार अग्रवाल व पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.