इंदोरा बु. पेट्रोल पंपावर ग्राहकांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2017 01:19 AM2017-06-28T01:19:42+5:302017-06-28T01:19:42+5:30
तिरोडा-खैरलांजी राज्य मार्गावर येत असलेल्या इंदोरा बु. बस स्थानक बाजार चौकापासून ४०० मीटर अंतरावर
लोकमत न्यूज नेटवर्क
परसवाडा : तिरोडा-खैरलांजी राज्य मार्गावर येत असलेल्या इंदोरा बु. बस स्थानक बाजार चौकापासून ४०० मीटर अंतरावर असलेल्या आराध्य इंडीयन आॅयल कंपनीचे पेट्रोल पंप आहे. या पंपावर ग्राहकांना कमी पेट्रोल देवून लूट होत असल्याची ओरड होती, पण सोमवारी (दि.२६) ही बाब सत्य निघाली.
सोमवारी दुपारी ४ वाजता बोरा येथील मोटारसायकल धारक राहुल निरंजन हिरापुरे गेले असता पेट्रोल पंपावरील संचालकाने १९० रुपयांऐवजी ११० रुपयांचे पेट्रोल दिले व ग्राहकाने मशीनकडे बघितले असता ११० रुपयांची पेट्रोल दिल्याचे आढळले. तसेच १९० रुपयांची संचालक भगतने मागणी केली असता ग्राहकांनी आरडाओरड केली. दरम्यान पंपाचे व्यवस्थापक पारधी आले व त्यांनी ग्राहकाला मोफत गाडीची टँक भरुन दिली. यात संचालक व व्यवस्थापक यांची साठगाठ असल्याचे निष्पन्न झाले.
या पंपवर ग्राहकांची लूट मोठ्या प्रमाणात होत आहे. मागील काही दिवसाअगोदर डिझेलमध्ये पाणीपण आढळले होते. सदर पेट्रोल पंपावर सुविधांचा अभाव आहे. ग्राहकांना पंपावर मुतारीची सोय असलेल्या ठिकाणी पाणी साचले आहे. खड्डेसुद्धा पडले आहेत.
कसलीही सुविधा उपलब्ध नाही. पेट्रोल पंपवर एकही ोर्ड फलक लागलेला नाही. तक्रार पुस्तिका नाही. शिवाय ग्राहकांशी असभ्य वर्तणूक करीत असून पेट्रोल पंप मालकावर कारवाईची मागणी मागणी परिसरातील ग्राहक, शेतकरी व नागरिकांनी केली आहे.