शिवार संवादातून शासकीय योजनांची माहिती
By admin | Published: June 2, 2017 01:27 AM2017-06-02T01:27:17+5:302017-06-02T01:27:17+5:30
तालुक्यात शिवार संवाद सभेच्या माध्यमातून आमदार विजय रहांगडाले यांनी संवाद साधला असून त्यामध्ये
ग्रामीण भागात सभा : विकास कामांवरही टाकला प्रकाश
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : तालुक्यात शिवार संवाद सभेच्या माध्यमातून आमदार विजय रहांगडाले यांनी संवाद साधला असून त्यामध्ये शासकीय योजनांची माहिती देवून शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यात राज्य सरकारने आतापर्यंत प्रामुख्याने राज्यातील ६८.६६ लक्ष हेक्टर क्षेत्र विमा संरक्षीत केला असून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, १४ जिल्ह्यात महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचा शेतकऱ्यांना लाभ, तसेच ५०० कोटी लोकसहभागातून दोन वर्षात ११,४८६ गावांमध्ये २,६५,६७८ कामे आतापर्यंत केलेली असून अवघ्या ३,४२२ कोटी रुपयात ११६४,३४७ हेक्टर इतकी सिंचनक्षमता वाढली आहे. तसेच कृषी विभागांतर्गत मागेल त्याला शेततळे अंतर्गत ५२ हजार शेततळ्यांसाठी लाभार्थ्यांची निवड झालेली असून ४५ हजार शेततळ्यांना मंजूरी देण्यात आली. त्यामधून ९ हजार शेततळी पूर्ण झालेली आहेत. तसेच २०१९ पर्यंत दुष्काळमुक्तीकडे शासनाची वाटचाल सुरु असल्याचे सांगीतले.
राज्यातील कृषीसिंचन क्षेत्र १६.०३ लाख हेक्टरवरून २०१५-१६ मध्ये १९.२२ लाख हेक्टर वर पोहोचली आहे. राज्यात २६ मोठ्या व मध्यम प्रकल्पाच्या पूर्तीसाठी केंद्राकडून ३८३० कोटी रु. तसेच नाबार्डकडून १२,८०० कोटी रुपये एवढी भरीव मदत झालेली आहे. तसेच पूर्व विदर्भात मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनाची विशेष मोहीम राबविली जात असून तालुक्याता भात खाचर दुरुस्ती व तलाव खोलीकरणाचे काम सुरु आहेत. तसेच जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून तिरोडा तालुक्यात सन २०१५-१६ मध्ये १४ गावे, सन २०१६-१७ मध्ये ९ गावे, सन २०१७-१८ मध्ये १० गावांची निवड तसेच गोरेगाव तालुक्यात सन २०१५-१६ मध्ये १ गाव, सन २०१६-१७ मध्ये ७ गावे, सन २०१७-१८ मध्ये ७ गावे असे विधानसभा क्षेत्रात ४८ गावामध्ये जलयुक्त शिवाराची कामे पूर्ण झाली असून त्याचा फायदा जनतेस होत आहे असे सांगीतले.
ही सर्व विकासकामे सुरु असून यामध्ये कामांचा दर्जा चांगला होण्यासाठी संबंधित यंत्रणेने लक्ष द्यावे व यासंबंधी तक्रार असल्यास नागरिकांनी माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ. चिंतामन रहांगडाले यांनी शिवार संवाद चर्चेतून केले. तसेच शासनाने शेतकऱ्यांसाठी बी,बियाणे, खत पुरवठा, विज पुरवठा सुरळीत चालण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत.
शिवार संवाद सभा तालुक्यात अर्जुनी, नहरटोला, मुंडीपार येथे घेतली असून शिवार संवाद सभेत प्रामुख्याने कृऊबास तिरोडाचे नवनिर्वाचीत संचालक डॉ. चिंतामण रहांगडाले, चतुर्भूज बिसेन, डॉ. वसंत भगत, पं.स.सदस्य डॉ. बी.एस.रहांगडाले, संजयसिंह बैस, तहसीलदार रामटेके, कुंभरे, गटविकास अधिकारी मानकर उपस्थित होते.