गोंदिया जिल्ह्यातील लसीकरणाची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:30 AM2021-04-09T04:30:57+5:302021-04-09T04:30:57+5:30
सुरू -०० बंद -०० एकूण लसीकरण - १ लाख ८ हजार २६६ डोस शिल्लक -००० गोंदिया जिल्ह्यात एकूण १४० ...
सुरू -००
बंद -००
एकूण लसीकरण - १ लाख ८ हजार २६६
डोस शिल्लक -०००
गोंदिया जिल्ह्यात एकूण १४० केंद्रावरुन कोरोना लसीकरण सुरु करण्यात आले होते. यासाठी ५८ हजार डोस उपलब्ध करुन देण्यात आले. त्यात १ लाख ८ हजार २६६ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. मात्र मंगळवारी लसींचा साठा संपल्याने बुधवारपासून सर्व १४० केंद्रावर लसीकरण पूर्णपणे बंद करण्यात आले. जिल्ह्यातील ३ लाख १५ हजार नागरिकांना लसीकरण होणे शिल्लक असून यासाठी ३ लाख १८ हजार लसींची गरज आहे. यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने लसींची मागणी केली आहे.
--------------
जिल्ह्यात रेमडेसिवीर तुटवडा नाही
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, खासगी रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. महिनाभर पुरेल एवढा साठा शिल्लक असल्याने सध्या रेमडेसिवीरची समस्या नाही. तर मेडिकल चालकांकडे मोजकाच साठा असला तरी जिल्ह्यात चढ्या दराने रेमडेसिवीरची विक्री होत असल्याची तक्रार नाही. शहरातील मेडिकल चालकांकडे १५० रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध असून शुक्रवारी आणखी स्टॉक येणार असल्याची माहिती आहे.