जिल्ह्यात मेंदूज्वर लसीकरण मोहिमेला सुरूवात
By admin | Published: June 28, 2014 11:38 PM2014-06-28T23:38:49+5:302014-06-28T23:38:49+5:30
गोंदिया जिल्ह्यात मेंदूज्वर लसीकरण मोहिमेची सुरूवात करण्यात आली. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने अंगणवाडीच्या बालकांना लस देण्यात आली.
कालीमाटी : गोंदिया जिल्ह्यात मेंदूज्वर लसीकरण मोहिमेची सुरूवात करण्यात आली. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने अंगणवाडीच्या बालकांना लस देण्यात आली.
यावेळी १२ हजार ३३८ बालकांना लस दण्यात आले. लसीकराणासाठी १ ते १५ वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश गीलानी यांनी दिली. मेंदूज्वर लसीकरण मोहीम २६ जून ते ९ जुलै १४ पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या २६ गावात सुरू करण्यात आली आहे. सदर मोहीम राबविण्याऱ्या प्रत्येक चमूत ५ आरोग्य सेवक व अंगणवाडी सेविकांचा समावेश आहे.
भविष्यात मेंदूज्वर मुक्त करण्यासाठी या मोहिमेची राष्ट्रीय पातळीवर सुरूवात करण्यात आली. मेंदूज्वर या रोगांचे प्रमाण वाढत असल्याने याला हद्दपार करण्यासाठी प्रशासनाने या मोहिमेवर लक्ष केंद्रीत केले आहे. याप्रसंगी डॉ. राजेश सी.गीलानी, डॉ. राजेश कोहाडे, संध्या काळे, पी.आई. गजभिये, संगीता भोंगाडे, आय.वाय.उके, अंगणवाडी सेविका क्रिष्णा गिऱ्हेपुंजे, मुन्नू कावडे, पुष्पा बहेकार, शोभा फुंडे व आशा सेविका यांनी सहकार्य केले.(वार्ताहर)