जखमी वनमजुराचा उपचारादरम्यान मृत्यू ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:30 AM2021-05-19T04:30:46+5:302021-05-19T04:30:46+5:30

सडक-अर्जुनी : नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पातील नागझिरा व पिटेझरी येथील कक्ष क्रमांक ९७, ९८, ९९ व १०० या ...

Injured forest laborer dies during treatment () | जखमी वनमजुराचा उपचारादरम्यान मृत्यू ()

जखमी वनमजुराचा उपचारादरम्यान मृत्यू ()

Next

सडक-अर्जुनी : नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पातील नागझिरा व पिटेझरी येथील कक्ष क्रमांक ९७, ९८, ९९ व १०० या परिसरात ८ एप्रिल रोजी लागलेल्या आगीला आटोक्यात आणण्याचे काम करीत असताना जखमी झालेल्या विजय तिजाब मरसकोल्हे (४२, रा.थाडेझरी) या वनमजुराचा उपचारादरम्यान सोमवारी (दि.१७) रात्री १० वाजेदरम्यान मृत्यू झाला.

नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्रात अज्ञात इसमाने लावलेल्या आगीला आटोक्यात आणण्याचे काम वनमजूर करीत होते; पण सायंकाळी ४ ते ५ वाजेदरम्यान सोसाट्याचा वारा आला आणि आगीने रौद्ररूप धारण केले. आग विझविण्याचा प्रयत्न करीत असताना पहाडी क्षेत्रात आग लागल्याने वनमजूर फसले होते. त्यातच तीन वनमजुरांचा होरपळून मृत्यू झाला होता, तर विजय मरसकोल्हे यांच्यासह अन्य एक वनमजूर गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी नागपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जखमी वनमजुरांच्या उपचारांचा खर्च शासनाकडून करण्यात येत होता. सोमवारी (दि.१७) रात्री विजय मरसकोल्हे यांचा मृत्यू झाला. आगीत मृत्यू झालेल्या तीन वनमजुरांच्या कुटुंबांना शासन, वन्यजीव विभाग तसेच एनजीओमार्फत आर्थिक मदत करण्यात आली होती. तीच मदत देण्यात यावी अशी मागणी मरसकोल्हे यांच्या कुटुंबाकडून करण्यात येत आहे.

.....

प्रकरणाची चौकशी गुलदस्त्यातच

नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्रात नेमकी आग कशामुळे व कुणामुळे लागली, याचा उलगडा अजूनपर्यंत झाला नाही. कोणत्या अज्ञात व्यक्तीने आग लावली याची वन्यजीव विभागाकडून अजूनही चौकशी करण्यात आली नाही. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यात थाडेझरी येथील वनमजुराचा मृत्यू झाला असून, गावात तणाव निर्माण होऊ नये व कोणतीही अप्रिय घटना होऊ नये म्हणून वन्यजीव विभागाने पोलीस विभागाला पाचारण करून पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

Web Title: Injured forest laborer dies during treatment ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.