अर्थसंकल्पात विदर्भावर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:32 AM2021-03-09T04:32:56+5:302021-03-09T04:32:56+5:30

- डॉ. परिणय फुके, आमदार. ...... अर्थसंकल्प म्हणजे पाण्यावर ओढलेल्या रेघोट्या गरीब, सर्वसामान्य, युवा आणि शेतकरी अशा कोणत्याही वर्गाच्या ...

Injustice on Vidarbha in the budget | अर्थसंकल्पात विदर्भावर अन्याय

अर्थसंकल्पात विदर्भावर अन्याय

Next

- डॉ. परिणय फुके, आमदार.

......

अर्थसंकल्प म्हणजे पाण्यावर ओढलेल्या रेघोट्या

गरीब, सर्वसामान्य, युवा आणि शेतकरी अशा कोणत्याही वर्गाच्या कल्याणाचा संकल्प नसलेला महाराष्ट्र सरकारचा आजचा अर्थसंकल्प म्हणजे पाण्यावर रेघोट्या ओढण्याचा प्रकार आहे. अर्थसंकल्प राज्याचा की केवळ मुंबईपुरता हेच कळायला मार्ग नव्हता. शेतकऱ्यांच्या मदतीचा कुठेही उल्लेख नाही. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या विषयावर एक शब्दही नाही.

- सुनील मेंढे, खासदार,

.......

विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सादर केेलेला अर्थसंकल्प हा खऱ्या अर्थाने विकासाला चालना देणारा आहे. अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, सिंचन, रस्ते विकास यावर भर देण्यात आला आहे; तर घरकामगार महिलांसाठी विशेष तरतूद केली आहे. अर्थसंकल्प तयार करताना सर्वच क्षेत्रांचा समतोल साधण्यात आला आहे.

- डॉ. नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.

......

विकासाला गती देणारा

महाविकास आघाडी सरकारने सलग दुसरा विकासाभिमुख अर्थसंकल्प सादर केला आहे. कोरोनासारख्या संकट काळातही सर्वच क्षेत्राच्या विकासाला गती कशी मिळेल, याचा विचार करण्यात आला आहे. एकंदरीत हा अर्थसंकल्प खऱ्याअर्थाने विकासाच्या दिशेने घेऊन जाणारा आहे.

- मुकेश शिवहरे, जिल्हाप्रमुख, शिवसेना.

......

शेतकरी हिताचा संकल्प

कोराेनासारख्या महामारीतसुध्दा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांचे हित साधण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज, कृषी पंपांचे थकीत बिलात ३३ टक्क्यांची सूट, गोसेखुर्द प्रकल्पासाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

- गंगाधर परशुरामकर, माजी जि. प. सदस्य.

.......

पुण्या-मुंबईला प्राधान्य देणार

अर्थसंकल्पात पुण्या-मुंबईतील प्रकल्पांना झुकते माप देण्यात आले आहे. विदर्भावर अन्याय करण्यात आला. या अर्थसंकल्पात कुठल्याही वर्गाला दिलासा मिळेल, अशा एकाही बाबीचा समावेश नसलेला अर्थसंकल्प अर्थहीन आहे.

- अशोक लंजे, माजी जि. प. सभापती.

Web Title: Injustice on Vidarbha in the budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.