जिल्हा सीमेवर वाहनचालकांची तपासणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 05:00 AM2020-05-01T05:00:00+5:302020-05-01T05:00:02+5:30
जिल्ह्यात भाजीपाला, रेशन, फळ व अन्य जीवनावश्यक वस्तू पर जिल्हे व राज्यांतून वाहनांच्या माध्यमातून येत आहेत. यातील बरेच वाहने उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि विशेषत: कोरोना हॉटस्पॉट असलेल्या नाशिक आणि नागपूर येथून येत आहेत. या वाहनांतील चालक व वाहकांचा येथील लोकांशी थेट संपर्क येत असून हा प्रकार धोकादायक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील काही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तुंची ने-आण करणाºया वाहनांची वर्दळ वाढली आहे. पर जिल्हे व राज्यातून येणाऱ्या या वाहनांच्या चालक व वाहकांचा जिल्ह्यातील लोकांशी प्रत्यक्ष संपर्क येतो. हा प्रकार धोकादायक असून अन्य जिल्ह्यांतून येणाºया वाहनांच्या चालक व वाहकांची जिल्हा सीमेवर तपासणी करावी अशी मागणी कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली असून जिल्हाधिकाºयांना या संदर्भात निवेदन दिले.
जिल्ह्यात भाजीपाला, रेशन, फळ व अन्य जीवनावश्यक वस्तू पर जिल्हे व राज्यांतून वाहनांच्या माध्यमातून येत आहेत. यातील बरेच वाहने उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि विशेषत: कोरोना हॉटस्पॉट असलेल्या नाशिक आणि नागपूर येथून येत आहेत.
या वाहनांतील चालक व वाहकांचा येथील लोकांशी थेट संपर्क येत असून हा प्रकार धोकादायक आहे. जिल्ह्यातील एकमेव रूग्ण आता बरा झाल्याने जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. अशात मात्र बाहेरून येणाऱ्या वाहनांच्या चालक व वाहकांमुळे धोका उत्पन्न होण्याची शक्यता टाळता येत नाही. करिता या वाहनांच्या चालक-वाहकांची जिल्हा सीमेवर वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना प्रवेश देण्यात यावा अशी मागणी कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अमर वऱ्हाडे, जिल्हा युवा काँग्रेसचे अध्यक्ष आलोक मोहंती, गोंदिया जिल्हा एनएसयुआयचे अध्यक्ष हरिष तुळसकर, अर्पीत बंसोड तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
बाहेर अडकलेल्या व्यक्तींना आणा
‘लॉकडाऊन’मुळे मोठ्या प्रमाणात मजूर, विद्यार्थी व काही लोक पर जिल्हे व राज्यांत अडकून पडले आहेत. जिल्हा बाहेर आणि विशेषत: परप्रांतात अडकलेल्या मजुरांकडे सध्या एक नवा पैसाही शिल्लक उरलेला नाही. त्यामुळे त्या लोकांपुढे उपासमारीची वेळ आली असून ते पायीच प्रवास करीत आपल्या गावाकडे निघाले आहेत. परिणामी मोठ्या संख्येत मजुरांचे जत्थे दिसत आहेत. त्यांचीही तपासणी होत नसल्याने तेही धोकादायक ठरत आहेत. जिल्ह्यातील अशा लोकांची यादी बनवून द्यावी. जेणेकरुन महाराष्ट्र शासनाचे आदेश येताच त्यांना परत आणण्याकरीता योग्य पाऊल उचलता येतील. विद्यार्थी व लोकांनाही अशाच प्रकारे आणण्याची व्यवस्था करता येईल असेही कॉँग्रेस पदाधिकाºयांची सूचविले. तसेच इतरत्र असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील तसेच जिल्ह्यामध्ये असणाºया परप्रांतीय विद्यार्थी आणि मजूरांची मोबाईल क्रमांकासहीत यादी सादर केली.