विभागीय समितीने केले निरीक्षण
By admin | Published: June 16, 2017 01:08 AM2017-06-16T01:08:31+5:302017-06-16T01:08:31+5:30
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात तालुका पासून जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या ग्राम चिचेवाडाची
चिचेवाडा ग्रामपंचायत : स्वच्छता अभियानात जिल्ह्यातून प्रथम
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात तालुका पासून जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या ग्राम चिचेवाडाची विभागीय समितीकडून पाहणी करण्यात आली.
अवघ्या राज्यात ग्राम स्वच्छतेचा संदेश जावा यासाठी शासनाकडून राज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविले जात आहे. या अभियानात तालुक्यातील ग्राम चिचेवाडाने तालुकापासून जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला असून या कार्यासाठी मुंबई येथील कार्यक्रमात गौरव करण्यात आला. यातच विभागस्तरीय आयुक्तांच्या समितीनेही गावचे निरीक्षण केले.
या समितीत वर्धाचे जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, उपायुक्त विपूल जाधव, मुख्य अभियंता विजय जगतारे, माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे सहायक संचालक जगन्नाथ पाटील, शाखा अभियंता अरूण पोहाणे, विस्तार अधिकारी छत्रपाल पटले यांचा समावेश होता. समितीने ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांची तपासणी केली.
गावात आलेल्या विभागीय समितीचे जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हा परिषद सदस्य उषा शहारे, सरिता रहांगडाले, पंचायत समिती सदस्य अर्चना ताराम, जेठभावडा ग्रामपंचायतचे सरपंच डॉ. रहांगडाले, खंड विकास अधिकारी मनोज हिरूडकर, दिनबंधू ग्रामीण विकास संस्थेचे कुलदीप लांजेवार, विस्तार अधिकारी पराते आदि उपस्थित होते व त्यांनी चिचेवाडा ग्रामपंचायतच्यावतीने विभागीय निरीक्षक समितीचे स्वागत केले.