कर्जमाफीची कामे त्वरित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 09:18 PM2017-08-24T21:18:09+5:302017-08-24T21:18:37+5:30
राज्यातील शेतकºयांची कर्जमाफी करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्यातील शेतकºयांची कर्जमाफी करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रि या सुरु केली आहे. येत्या १५ सप्टेबर पर्यंत कर्जमाफीबाबतची कार्यवाही प्रशासनाने त्वरीत पूर्ण करावी. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवार (दि.२४) रोजी कर्जमाफी व पीक परिस्थितीच्या आढावा सभेत पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, माजी आमदार डॉ.खुशाल बोपचे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, आर.टी.शिंदे, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक दिलीप सिल्हारे, सहकारी संस्थेचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक मिलींद आटे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सर्वश्री गेडाम, ढोरे, छप्परघरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. बडोले म्हणाले, ग्रामपंचायत स्तरावर असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र, सी.एस.सी.सेंटर या केंद्रावरुन शेतकºयांचे कर्जमाफीचे अर्ज व्यवस्थीत भरावे. यासाठी कृषी, महसूल व ग्रामपंचायत विभागाने काळजीपूर्वक काम करावे.
कोणताही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्या शेतकºयांंनी अद्याप आधारकार्ड काढलेले नाही त्यांचे आधारकार्ड काढण्याची कार्यवाही करावी. १५ सप्टेबर पूर्वी संबंधित विभागाच्या अधिकाºयांची जिल्हाधिकाºयांनी बैठक घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात धानाचे ४० टक्के नुकसान झाल्याचे सांगून बडोले म्हणाले, ज्या शेतकºयांनी धान रोवणी केलेली नाही असे शेतकरी, कमी पावसामुळे मध्यम व उच्च प्रतीच्या धानाचे नुकसान झालेले शेतकरी यांची स्वतंत्र यादी तयार करावी. त्यामुळे शेतकºयांना मदत करता येईल. ज्या शेतकºयांच्या धानिपकाचे नुकसान झाले आहे अशा शेतकºयांना दुसरे पीक म्हणून उडीद, मुंग याची लागवड करण्यासाठी बियाणे उपलब्ध करु न देण्यास मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जेवढ्या शेतकºयांनी पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी आॅफलाईन अर्ज केले आहेत त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल. सिंचनासाठी शेतीला १२ तास वीजपुरवठा करण्यात येईल. कोणत्याही शेतकºयांचे वीज कनेक्शन तोडण्यात येणार नाही, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
यावर्षी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याचे सांगून बडोले म्हणाले, जिल्ह्यात असलेल्या कोल्हापूरी बंधाºयातील पाणी अडविण्यासाठी बंधाºयात ८ दिवसाच्या आत पाट्या लावण्यात याव्या. जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावात पाणीसाठा व्यवस्थीत राहील याचे नियोजन करावे.
जिल्ह्यात उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. त्यामुळे शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होण्यास मदत होईल. ज्या प्रकल्पांचा भूसंपादन निधी उपलब्ध झाला आहे. त्याचे वाटप संबंधित शेतकºयांना तातडीने करावे. अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प वेळीच पूर्ण करण्याचे नियोजन करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी काळे यावेळी म्हणाले, कर्जमाफीच्या दृष्टीने जिल्ह्यातील प्रत्येक केंद्राने १० अर्ज प्रती दिवस आॅनलाईन करावे असे त्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. महसूल, कृषि व ग्रामपंचायत विभागाच्या योग्य समन्वयातून जिल्ह्यातील पात्र शेतकºयांचे आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रि या १० सप्टेबर पूर्वीच पूर्ण करण्यात येईल असेही त्यांनी या वेळी सांगितले.
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी इंगळे यांनी जिल्ह्यात आतापर्यंत झालेला पाऊस व धानाची रोवणी याबाबतची माहिती दिली.
जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक शिलारे यांनी मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरु ण-तरु णींना कर्ज उपलब्ध करु न देण्याबाबत व बेरोजगारांच्या तक्रारी येणार नाहीत यादृष्टीने बँकांनी या योजनेसाठी काम करावे. अशा सूचना बँकांना दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सभेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य व्यवस्थापक वासनिक, सहायक निबंधक .गोस्वामी यांचीही उपस्थिती होती.