अवैध ई-तिकीट व्यवसायाचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 12:05 AM2018-11-07T00:05:30+5:302018-11-07T00:07:04+5:30

रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने रेल्वेत ई-तिकीटाची अवैधरित्या खरेदी-विक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून काही ई-तिकीट व साहित्य जप्त करण्यात आले.

Invalid e-ticket business expose | अवैध ई-तिकीट व्यवसायाचा पर्दाफाश

अवैध ई-तिकीट व्यवसायाचा पर्दाफाश

Next
ठळक मुद्देऐजंट पोलिसांच्या हाती : संगणकासह साहित्य जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने रेल्वेत ई-तिकीटाची अवैधरित्या खरेदी-विक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून काही ई-तिकीट व साहित्य जप्त करण्यात आले.
सोमवारी (दि.५) दुपारी २.३० वाजतादरम्यान रेल्वे सुरक्षा दलाचे गुन्हे शाखा प्रभारी निरीक्षक एस.दत्ता व उपनिरीक्षक एस.एस.बघेल यांनी आपल्या पथकासह रेलटोली स्थित एम.वी.टूर अँड ट्रॅव्हल्समध्ये तपासणी केली. या एजंसीचे संचालक नितीन वरू (५४) यांच्याकडे त्यांच्या पर्सनल युजर आईडीवरून बनविलेल्या रेल्वे ई-तिकीट जप्त केल्या. चौकशीत त्याने तो आईआरसीटीसीचा अधिकृत एजंट असल्याचे सांगीतले. आपल्या पर्सनल युजर आईडीशिवाय तो अतिरीक्त फायदा कमविण्यासाठी घोडा ४११, घोडा ४१५, घोडा ५२३, घोडा ४१० व घोडा ४३३ यासारख्या अन्य कित्येक नावांची बनावट आईडी बनवून ग्राहकांकडून प्रती प्रवासी १००-२०० रूपये प्रवास रकमेशिवाय अतिरिक्त घेत होता. विशेष म्हणजे, चौकशी व दुकानाचा तपास साक्षदारांच्या उपस्थितीत करण्यात आला. यादरम्यान, दुकानातून तत्काल तिकीट तयार करणाºया नितीन वरू यांच्या संगणकातून सुरक्षित पर्सनल आईडीने बनविलेल्या रेल्वे तिकीट जप्त केल्या. संगणकासह दुकानातून जप्त ई-तिकीटांच्या आधारावर रेल्वे अधिनियम कलम १४३ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रसंगी ९ लाईव ई-तिकीटा ज्यात रेल्वे प्रवास व्हायचा आहे (किंमत ७१७० रूपये), २ जुन्या प्रवासी तिकिटा ज्यात प्रवास झालेला आहे.(किंमत २४१५ रूपये), ४५ हजार ५०० रूपयांचा संगणक संंच जप्त करण्यात आला आहे. हे प्रकरण पुढील तपासाठी रेल्वे पोलिसांकडे देण्यात आले आहे. दरम्यान या कारवाईमुळे अवैध ई-तिकीट तयार करुन देणाºयाचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Web Title: Invalid e-ticket business expose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे