अवैध दारू विक्रेत्यांवर गाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 10:30 PM2018-04-15T22:30:15+5:302018-04-15T22:30:15+5:30

जिल्ह्यात होत असलेल्या अवैध दारू विक्रीवर आळा बसावा यासाठी जिल्हा पोलिसांनी शनिवारी (दि.१४) धाडसत्र राबविले. यामध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणात देशी व मोहफुलाची दारू जप्त केली.

Invalid liquor vendors | अवैध दारू विक्रेत्यांवर गाज

अवैध दारू विक्रेत्यांवर गाज

Next
ठळक मुद्देपोलिसांचे धाडसत्र : मोठ्या प्रमाणात देशी व मोहफुलाची दारू जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात होत असलेल्या अवैध दारू विक्रीवर आळा बसावा यासाठी जिल्हा पोलिसांनी शनिवारी (दि.१४) धाडसत्र राबविले. यामध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणात देशी व मोहफुलाची दारू जप्त केली.
यांतर्गत, डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्राम सावंगी येथील विश्वजित गुलाब गेडाम (४५) याच्याकडून देशी दारूचे १८० मि.ली.चे चार पव्वे जप्त केले. दवनीवाडा पोलिसांनी सितूटोला-दासगाव येथील गणेश सुरजलाल टेकाम (३०) याच्याकडून मोहफुलाची २० लिटर दारु तर प्रकाश बाबुलाल टेकाम (४०) याच्याकडून हातभट्टीची २० लिटर दारू बलमाटोला येथून, पंचवटी- देवलगाव येथून तिरुपती बलराम तुसलीपार (३४) याच्याकडून देशी दारूचे १४ पव्वे जप्त केले. गोरेगाव पोलिसांनी ग्राम हिरडामाली येथील राजेश रामकृष्ण बन्सोड (३४) याच्याकडून हातभट्टीची पाच लिटर दारू, देशी दारूचे पाच पव्वे व दारु पिण्याचे साहित्य जप्त केले. दवनीवाडा पोलिसांनी लोधीटोला येथील सुंदरा हरिदास चन्ने (४५) याच्याकडून देशी दारूचे पाच पव्वे, परसवाडा येथील अनिता मुकेश मेश्राम (३७) हिच्याकडून हातभट्टीची पाच लिटर दारू जप्त केली.
अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी बोंडगावदेवी येथील रामनाथ मोनू मेश्राम (४०) याच्याकडून देशी दारूचे सात पव्वे, चिचगड पोलिसांनी सुकडीटोला येथील धनीराम मेहतरलाल मडावी (३७) याच्याकडून मोहफुलाची पाच लिटर दारू जप्त केली. ग्रामीण पोलिसांनी ग्राम इर्री येथील संगिता जितेंद्र भालाधरे (४५) हिच्याकडून हातभट्टीची पाच लिटर दारू, पांढराबोडी येथील सुनील मुन्नालाल लिल्हारे (४५) याच्याकडून विदेशी दारूचे चार पव्वे जप्त केले. सालेकसा पोलिसांनी रामाटोला येथील फुलचंद रावजी पंधरे (५९) मोहफुलाची तीन लिटर दारू, सोनपुरी येथील भाग्यवंती सहसराम नागपुरे हिच्याकडून देशी दारूचे चार पव्वे जप्त केले. तिरोडा पोलिसांनी बेलाटी येथील संगीता राजेंद्र बडनाग (३२) हिच्या कडून हातभट्टीची १० लिटर दारु जप्त केली.
तिरोडा पोलिसांनी शहरातील शास्त्री वॉर्डातील सिंधू शंकर डोळस (४८) हिच्याकडून हातभट्टीची १० लिटर दारू, कोडेलोहारा येथील दिशा अनिल मेश्राम (३४) हिच्या कडून हातभट्टीची १० लिटर दारू, वडेगाव येथील प्रकाश कपूरचंद बरियेकर (३२) याच्याकडून हातभट्टीची १५ लिटर दारू, मुंडीकोटा येथील कविता राजेश मालाधरे (४३) हिच्याकडून हातभट्टीची १५ लिटर दारू जप्त केली. गंगाझरी पोलिसांनी कोहका येथील ओमप्रकाश तिलचंद दमाहे (३६) याच्याकडून हातभट्टीची दोन लिटर दारू जप्त केली. तर शहर पोलिसांनी श्रीनगरातील रितेश सेवकराम बनकर (२७) याच्याकडून भिमनगरातून हातभट्टीची आठ लिटर दारू तसेच अंजोरा येथील लक्ष्मीकांत अशोक कांबळे (३०) याच्याकडून देशी दारूचे १० पव्वे पोलिसांनी जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Invalid liquor vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.