अवैध रेतीची वाहतूक सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2017 12:36 AM2017-03-10T00:36:34+5:302017-03-10T00:36:34+5:30

तालुक्यातील बिंझली परिसरात कुआढास नाल्यातून अवैध रेतीचा उपसा करून वनीकरणाच्या जागेवरून वाहतूक केली जात आहे.

Invalid sandstep traffic | अवैध रेतीची वाहतूक सुरुच

अवैध रेतीची वाहतूक सुरुच

Next

सालेकसा : तालुक्यातील बिंझली परिसरात कुआढास नाल्यातून अवैध रेतीचा उपसा करून वनीकरणाच्या जागेवरून वाहतूक केली जात आहे. त्यामुळे अनेक वृक्षांचे नुकसान झाल्याचा आरोप येथील वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पूनमचंद गिरीया यांनी केला आहे. तसेच या परिसरातून रेती वाहतूक थांबविण्याची यावी, वृक्षांची सुरक्षा करण्यात सहकार्य करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मागील जुलै महिन्यात राज्य शासनाने दोन कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला होता. त्या अंतर्गत तालुक्यात विविध ठिकाणी वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आली. बिंझली गावाच्या १० हेक्टर परिसरात जवळपास २५ हजार रोपट्यांची लागवड करण्यात आली होती. त्या वनीकरणाला कुंपणसुद्धा करण्यात आले होते. परंतु त्या परिसरातूनच अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतात ये-जा करावी लागत असल्यामुळे त्यांना रस्ता देण्यात आला. परंतु रेती वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी कुंपण जास्त प्रमाणात हटवून वनीकरण केलेल्या परिसरातून रेतू वाहतूक करणे सुरू केले. ६ फेब्रुवारीला महसूल विभागाने तीन ट्रॅक्टर अवैध रेती वाहतूक करताना पकडले व कारवाई केली. परंतु या दरम्यान अनेक वृक्षांची नासधूस झाली आहे. तसेच कुंपण तोडल्यामुळे गाव परिसरातील जनावरेसुद्धा मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड परिसरात जावून चरतात, त्यामुळे जनावरांनीही अनेक वृक्ष नष्ट करून टाकले आहेत. या प्रकारामुळे शासनाची दोन कोटी वृक्ष लागवड योजना यशस्वी होणार की लोकांच्या असहकार्यामुळे मोठ्या परिश्रमाने लावलेले वृक्ष जमीनदोस्त होतील किंवा गुरांचा चारा बनून राहतील, असे सदर परिस्थिती पाहून वाटते.
वृक्षांची जोपासना व्हावी म्हणून वन व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांसह सचिव यांचीसुद्धा देखरेख व निगा आवश्यक असते. परंतु सचिव व वन क्षेत्र सहायक सी.जी. मडावी येथील वृक्षांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पूनमचंद गिरिया, उपाध्यक्ष जियालाल लिल्हारे, कोषाध्यक्ष लेखसिंह मस्करे, सहसचिव गणेश लिल्हारे, सदस्य हरिलाल रत्नाकर, छबिलाल लिल्हारे, रमेश सूर्यवंशी, नोहरलाल लिल्हारे, रमणलाल रत्नाकर, रामदास ढेकवार यांनी केला आहे.(तालुका प्रतिनिधी)

गावातील मतभेदांमुळे नुकसान
बिंझली परिसरात १० हेक्टर जागेवर २५ हजार वृक्ष लागवड करण्यात आली आहे. या परिसरातच शेतकऱ्यांना आपल्या शेतात ये-जा करण्यासाठी आधीपासूनच पांदण रस्ता आहे. त्यामुळे वृक्ष लागवड केली तेव्हा त्यांना रस्ता मोकळा करून देण्यात आला. वृक्षांच्या देखरेखीची जबाबदारी वन विभाग व वन व्यवस्थापन समितीची असली तरी गावकऱ्यांचे सहकार्य आवश्यक आहे. परंतु बिंझली गावात गटबाजी आणि आपसात वैमनस्य असल्यामुळे वृक्षांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच त्या ठिकाणातून रेतीची वाहतूक होते. त्यामुळे वनीकरण बाधित होत आहे.

Web Title: Invalid sandstep traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.