चुरडी घटनेचा सखोल तपास करून न्याय द्या ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:31 AM2021-09-26T04:31:10+5:302021-09-26T04:31:10+5:30
गोंदिया : चुरडी येथील घटनेचा सखोल तपास करून न्याय मिळावा यासाठी पवार प्रगतिशील मंच गोंदियाच्या वतीने गृहमंत्र्यांच्या नावाचे निवेदन ...
गोंदिया : चुरडी येथील घटनेचा सखोल तपास करून न्याय मिळावा यासाठी पवार प्रगतिशील मंच गोंदियाच्या वतीने गृहमंत्र्यांच्या नावाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले.
२१ सप्टेंबरला तिरोडा तालुक्यातील चुरडी येथे एका कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आली. या अमानवीय घटनेमुळे समाजात रोष आहे. चुरडी येथील रेवचंद व मालता बिसेन हे दांपत्य आणि पौर्णिमा व तेजस ही त्यांची दोन मुले या चौघांचे मृतदेह दोन वेगवेगळ्या खोलीत आढळले. यात मालता, पौर्णिमा व तेजस यांच्या डोक्यावर प्रहार करून निर्दयतेने ठार करण्यात आले. तर रेवचंद यांचा मृतदेह गळफास लागलेल्या स्थितीत आढळला. याप्रकरणी पोलिसांत हत्येचा गुन्हा हो नोंद झाला; परंतु प्रकरणाचा तपास पाहिजे त्या गतीने होताना दिसून येत नाही. तेव्हा समाजाच्या मनाच्या भावना लक्षात घेऊन पीडित कुटुंबाला न्याय द्यावा व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शिष्टमंडळात अध्यक्ष ॲड. पृथ्वीराज चव्हाण, उपाध्यक्ष दिनेश हरिणखेडे, सचिव डॉ. प्रीती (देशमुख) गौतम, सहसचिव हुपेंद्र बोपचे, कोषाध्यक्ष सुरेश पटले, संघटन सचिव अजय रहांगडाले, प्रचार सचिव महेंद्र बिसेन, सदस्य छत्रपाल बिसेन, पन्नालाल ठाकरे, हेमंत बघेले, गौरव तुरकर, रश्मी रहांगडाले, दिलीप पारधी, पंकज पटले, रजत ठाकूर व समाजबांधव उपस्थित होते.