वृक्ष लागवड केलेल्या कामाची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:20 AM2021-06-19T04:20:19+5:302021-06-19T04:20:19+5:30
वृक्ष लागवड अंतर्गत हलबीटोला रस्त्याच्या कडेला खड्डे खोदून नाममात्र वृक्ष लागवड करण्यात आली. झाडाला कुंपण नाही, खत नाही, औषधी ...
वृक्ष लागवड अंतर्गत हलबीटोला रस्त्याच्या कडेला खड्डे खोदून नाममात्र वृक्ष लागवड करण्यात आली. झाडाला कुंपण नाही, खत नाही, औषधी मारण्यात आली नाही. काही झाडे मेलेल्या अवस्थेत आहेत. तसेच झाडांना पाणी पण मिळत नाही. तसेच सामूहिक वनीकरणाचे अधिकारी माहे फेब्रुवारी २०१९ पासून तर आतापर्यंत लावलेल्या झाडांची मोका तपासणी केलेली नाही. तसेच किती मजूर आहेत याची सहनिशा सुद्धा केली नाही. वृक्ष लागवड करण्यासाठी आणलेले रोपे जंगल परिसरात फेकलेल्या अवस्थेत आढळले. ही सगळी माहिती गावातील नागरिकांनी सामाजिक वनीकरण आमगाव येथील अधिकाऱ्यांना दिली. परंतु आतापर्यंत कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाही. आणि म्हणून गावकऱ्यांची अशी मागणी आहे की अशा निष्काळजीपणा असणारे अधिकाऱ्यांची चौकशी करुन निलंबित करायला पाहिजे व वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत वृक्ष लागवड योजनेची सखोल चौकशी करावी मागणी केली.
कोट
वृक्ष लागवड केल्यापासून तर आतापर्यंत संपूर्ण कामाची तपासणी सामाजिक वनीकरणाचे वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत मोका तपासणी करुन व चौकशी करुन ज्या अधिकाऱ्याकडे लागवड योजनेचे काम होते त्याला निंलंबित करण्यात यावे.
-आत्माराम भेंडारकर, कोटरा