नाल्यावरील पूल अपघाताला आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:04 AM2017-11-01T00:04:24+5:302017-11-01T00:04:39+5:30
कुआढास नाल्यावरील सालेकसा-नानव्हा मार्गावरील पुलाचे दोन्ही बाजुचे कठडे गायब झाले आहे. तर या पुलाची उंची देखील कमी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : कुआढास नाल्यावरील सालेकसा-नानव्हा मार्गावरील पुलाचे दोन्ही बाजुचे कठडे गायब झाले आहे. तर या पुलाची उंची देखील कमी आहे. त्यामुळे या मार्गावर बरेचदा अपघात सुध्दा झाले आहे. पावसाळ्यात दिवसात तर यामुळे परिसरातील नागरिकांची अनेकदा गैरसोय होते.
नाल्यावर पुलाची उंची फार कमी असल्याने दोन्हीबाजूने येणारे वाहन वेगाने उतरुन पुलावर असंतुलीत होतात. तर पुलाची रूंदी सुध्दा फार कमी असल्याने असंतुलीत वाहन नाल्यात कोसळून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या नाल्यावर पुलाच्या दोन्ही बाजुला लावले लोखंडी कठडे सुध्दा गायब झाले आहे.
मागील दोन वर्षांपासून लोखंडी कठडे लावण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेवून या पुलावरुन ये-जा करावी लागते. या नाल्यावरील पुलाची उंची वाढविण्याची गरज आहे. यासाठी या परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे नवीन पूल तयार करण्याची मागणी केली आहे. या पुलावरुन तालुकास्थळी आपल्या कामानिमित्त नानव्हा, खोलगड, बिंझली, गरुटोला, भंसूला, घोंसी, दरबडा इत्यादी गावातील लोक नेहमी ये-जा करतात. त्यामुळे गावकºयांची समस्या लक्षात घेवून नवीन पूल तयार करण्याची मागणी आहे.