देवरी-आमगाव रस्ता अपघाताला आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:10 AM2018-03-13T00:10:57+5:302018-03-13T00:10:57+5:30
सध्या देवरी-आमगाव रस्त्याचे काम सुरु आहे. परंतु या कामामुळे रस्त्यावर धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.
आॅनलाईन लोकमत
लोहारा : सध्या देवरी-आमगाव रस्त्याचे काम सुरु आहे. परंतु या कामामुळे रस्त्यावर धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. या रस्त्यावर वाहनांची रहदारी अधिक आहे. त्यामुळे सर्वांना या समस्येला सामोरे जावे लागते. वाहनांच्या उडणाºया धुळीमुळे या मार्गावर अपघाताची शक्यता वाढली आहे.
या रस्त्यावर वाहनांमुळे धूळ मोठ्या प्रमाणात उडते. दुचाकी तसेच चारचाकी वाहनांना समोरुन मागून येणारे वाहन दिसत नाही आणि केव्हाही अपघात घडू शकते. या अपघातांना जवाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांपुढे आहे. दुसरी बाब म्हणजे सदर रस्त्यावर ज्याठिकाणी पुलाचे काम केले आहे, त्याठिकाणी खड्डे पडलेले दिसून येत आहेत. या खड्ड्यांमुळे सुध्दा अपघात घडू शकते.
सदर काम करणाºया कॉन्ट्रक्शन कंपनीने या बाबीची खबरदारी घेणे आवश्यक आहे. परंतु गावातील आक्रोश व्यक्त करणाºया नागरिकांनी समस्त कॉन्ट्रक्शन कंपनीच्या पदाधिकाºयांना बोलावून उडणाºया धुळीविषयी सांगितले असता त्यांनी लोकांना उलट उत्तरे दिलीत. हमारे भी आदमी धुल में रहते है, अशा प्रकारचे प्रतिउत्तर दिले. शेवटी नागरिकांनीच रस्त्यावर पाणी मारले तर धुळ उडणार नाही, अशी समझ दिली.
आता उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आणि पाण्याची पातळी खोलवर गेलेली आहे. ग्रामीण भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यावरुन रस्त्याच्या कन्ट्रक्शन कंपनीला पाणी मिळणार. सामान्य जनतेच्या या समस्येचा तोडगा कसा निघणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.