पुढील वर्षाचे आमंत्रण देत बाप्पाला दिला निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:31 AM2021-09-21T04:31:39+5:302021-09-21T04:31:39+5:30
डीजे बंदीमुळे मिरवणुकांचा दणदणाट कमी होता पण गोल्डन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा आवाज बापाच्या विसर्जनावेळेस मात्र चांगलाच घुमून राहिला ...
डीजे बंदीमुळे मिरवणुकांचा दणदणाट कमी होता पण गोल्डन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा आवाज बापाच्या विसर्जनावेळेस मात्र चांगलाच घुमून राहिला होता. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत गणरायाची मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर रविवारी गणेशाला गोल्डन गणेश उत्सव मंडळातर्फे 'गणपती बापा मोरया पुढच्या वर्षी लवकर' या जयघोषाने निरोप देण्यात आला. विशेषत: मंडळातर्फे सामाजिक क्षेत्रातील कार्यांवर जास्त भर देण्यात आला व त्यात रक्तदान शिबीर, दोन दिवसाचे मतदार नोंदणी शिबीर, समाज प्रबोधन, वृक्षारोपण, १० दिवस गणरायांच्या मंडपात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
देवरी शहरातील मानाचा गणपती अर्थात केशोरी नगरीचा 'राजा' रविवारी विसर्जनासाठी रात्री ११.०० वाजता बाहेर पडला. देवरी शहरात अनेक गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. सर्व मानाच्या गणपतींचे विसर्जन स्थानिक प्रशासनाच्या नियमांचे पालन करत व कोरोनाची जान ठेवत नगरपंचायतीने ठरविलेल्या ठिकाणी करण्यात आले.