स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 10:31 PM2017-12-05T22:31:45+5:302017-12-05T22:32:05+5:30
दिव्यांग विद्यार्थ्यांंमध्ये कुठल्याच प्रकारची कल्पकता नाही. या क्र ीडा स्पर्धा त्यांच्या सुप्त गुणांना चालना देणाऱ्या आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांनी केले.
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : दिव्यांग विद्यार्थ्यांंमध्ये कुठल्याच प्रकारची कल्पकता नाही. या क्र ीडा स्पर्धा त्यांच्या सुप्त गुणांना चालना देणाऱ्या आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांनी केले.
रविवारी (दि.३) जागतिक दिव्यांग दिनानिमीत्त ग्राम कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजीत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्र ीडा स्पर्धांच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य सीमा मडावी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे उपस्थित होते. पुढे बोलताना मेंढे यांनी, विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांनी अशाप्रकारचे शिक्षण द्यावे की त्यांच्या मनातील आपण दिव्यांग असल्याचा न्यूनगंड दूर होण्यास मदत होईल. त्यांच्या पालकांनाही माझी मुले दिव्यांग असून सुद्धा शाळांमधून चांगले शिक्षण घेत असल्याचे वाटावे असे मत व्यक्त केले.
मडावी यांनी, दिव्यांग मुले-मुली शारिरीकदृष्टया दिव्यांग असले तरी त्यांनी मनाने आपण दिव्यांग नाही ही भावना ठेवावी. सर्वसामान्य लोकांसारखेच आम्ही देखील आहोत अशाप्रकारची भावना दिव्यांग बांधवांमध्ये असली पाहिजे. मन सुदृढ असले आणि विचार चांगले असतील तर कोणत्याही दिव्यंगत्वावर मात करता येते असे मत व्यक्त केले. बरकते यांनी, कुठलेही दिव्यंगत्व हे शरीरात असणे हे यश संपादन करण्यासाठी अडसर ठरु शकत नाही. युपीएससीच्या परीक्षेत उल्हासनगर येथील प्रांजल पाटील या दोन्ही डोळ््यांनी आंधळ््या असून देखील आयएएस बनल्या. शारिरीक आण मानिसक अपंगत्व ज्या विद्यार्थ्यांमध्ये आहे त्यांनी आपल्या बुद्धीने त्यावर मात करावी असेही ते म्हणाले.
संचालन करून आभार जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके यांनी मानले. यावेळी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
स्पर्धेत २५० विद्यार्थ्यांनी घेतला भाग
क्र ीडा स्पर्धेत येथील मंगलम मुकबधीर शाळा, डी.पी.पटेल मतिमंद मुलांची शाळा, श्रीराम मतिमंद निवासी शाळा, आमगाव येथील मानवता मतिमंद मुलांची शाळा, सडक-अर्जुनी व देवरी येथील दंडकारण्य निवासी अपंग विद्यालय, गोरेगाव येथील ज्ञानिदप मतिमंद मुलांची शाळा, उमर्रा येथील जमुनाबाई निवासी मतिमंद विद्यालयातील २५० विद्यार्थ्यांंनी क्र ीडा स्पर्धेत सहभाग घेतला. यामध्ये धावणे ५० मीटर, १०० मीटर, २०० मीटर, गोळा फेक, थाळी फेक, उंच उडी, लांब उडी, स्पॉट जम्प, बादलीत बॉल टाकणे, भराभर चालणे आदी क्र ीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांंनी सहभाग घेतला.