शासकीय धान खरेदी केंद्रावरील आवक घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:41 AM2017-10-29T00:41:40+5:302017-10-29T00:43:45+5:30
शेतमालाला हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ यांच्यातर्फे जिल्ह्यात नुकतेच ८० शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शेतमालाला हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ यांच्यातर्फे जिल्ह्यात नुकतेच ८० शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र कमी पावसामुळे हलक्या धानाला जोरदार फटका बसला आहे. परिणामी धान खरेदी केंद्रावरील आवक घटल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. दरवर्षी दिवाळी दरम्यान हलके धान विकून शेतकरी दिवाळीचा सण साजरा करतात. मात्र यंदा जिल्ह्यात कमी पाऊस झाला. शिवाय हलक्या धानाला वादळी पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे धानाचे उत्पादन आणि दर्जावर देखील परिणाम झाला आहे.
दरवर्षी दिवाळीच्या सुरुवातीपासून धान खरेदी केंद्र आणि खासगी व्यापाºयांकडे धान विकण्यासाठी शेतकºयांची गर्दी दिसत होती. मात्र यंदा दिवाळी संपून आठ ते दिवसांचा कालावधी लोटला. यानंतरही शासकीय धान खरेदी केंद्रावरील आवक वाढलेली नाही. त्यामुळे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर शुकशुकाट असल्याचे चित्र आहे.
यावर्षी शासनाने अ ग्रेड धानाला १५९० व सी ग्रेड धानाला १५५० हमीभाव जाहीर केला आहे. वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत हे दर जरी कमी असले तरी यापेक्षा कमी दराने शेतकºयांना धान विकण्याची वेळ येऊ नये, यासाठी शासनाने गोंदिया जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशतर्फे ५८ आणि आदिवासी विकास महामंडळा अंतर्गत २८ धान खरेदी केंद्र सुरू केले आहेत.
मात्र यासर्वच केंद्रावर आवक वाढली नसल्याचे चित्र आहे. देवरी आदिवासी विकास महामंडळातंर्गत दरवर्षी खरीपात ३ लाख क्विंटल धानाची खरेदी केली जाते. मात्र यंदा कमी पाऊस आणि कीडरोगांमुळे धानाच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे धान खरेदी अर्ध्यावर येण्याची शक्यता या विभागाच्या अधिकाºयांनी वर्तविली आहे.
तर हीच स्थिती जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची आहे.