गोंदिया जिल्ह्यातल्या झासीनगरच्या गावकऱ्यांनी बनवले आवक-जावक रजिस्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 06:47 PM2020-05-02T18:47:32+5:302020-05-02T18:47:56+5:30

अवघे जग कोरोनाशी दोन हात करत असताना गोंदिया जिल्ह्यातल्या झाशीनगर या लहानशा गावातील नागरिकांनीही आपला खारीचा वाटा उचलला आहे.

Inward-outward register made by the villagers of Jhasinagar in Gondia district | गोंदिया जिल्ह्यातल्या झासीनगरच्या गावकऱ्यांनी बनवले आवक-जावक रजिस्टर

गोंदिया जिल्ह्यातल्या झासीनगरच्या गावकऱ्यांनी बनवले आवक-जावक रजिस्टर

Next
ठळक मुद्देयेणाऱ्या-जाणाऱ्यांची केली जाते नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: अवघे जग कोरोनाशी दोन हात करत असताना गोंदिया जिल्ह्यातल्या झाशीनगर या लहानशा गावातील नागरिकांनीही आपला खारीचा वाटा उचलला आहे. कोरोनाबाधितांचे गावात आगमन होऊ नये व गावातला कुणी बाहेर जात असेल तर त्याची दखल घेण्याचा प्रघात या गावकऱ्यांनी पाडला आहे. गावात येणाऱ्या व गावावरून दुसऱ्या गावी जाणाऱ्या प्रवाशांची नावे लिहून ठेवली जात आहेत. तसेच गावात कोणाकडे कोण आले आहे, कशासाठी व किती दिवसांसाठी आले आहे अशी इथ्यंभूत माहिती त्यात लिहिली जाते. यात गावचे सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील व नागरिकांचे सहकार्य लाभत आहे. तसेच गावात बाहेरून आलेल्या व्यक्तींसाठी शाळेतच क्वारंटाईनची सुविधा केली आहे.

 

Web Title: Inward-outward register made by the villagers of Jhasinagar in Gondia district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.