पाणी पुरवठा योजनेच्या कामात अनियमितता
By admin | Published: October 7, 2015 12:29 AM2015-10-07T00:29:09+5:302015-10-07T00:29:09+5:30
तिरोडा तालुक्यातील ैपरसवाडा येथील ग्रामीण पाणी पुरवठा योजना अंतर्गत केलेल्या कामात तत्कालीन सरपंच मणिराम हिंगे यांनी अनियमितता केली आहे
अधिकाऱ्यांकडे तक्रार: पाण्यासाठी नागरिकांची ओरड
इंदोरा बु. : तिरोडा तालुक्यातील ैपरसवाडा येथील ग्रामीण पाणी पुरवठा योजना अंतर्गत केलेल्या कामात तत्कालीन सरपंच मणिराम हिंगे यांनी अनियमितता केली आहे. या कामात अनेक गैरप्रकार झाल्याची तक्रार माजी सरपंच चंदन वासनिक व राकेश वैद्य यांनी केली आहे.
जिल्हा ग्रामीण पुरवठा अधिकारी गोंदिया, मुख्य कार्यपालन अधिकारी गोंदिया तसेच खंडविकास अधिकारी तिरोडा यांना दिलेल्या तक्रारीत चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
परसवाडा येथे सन २०१०-११ या वर्षी ग्रामीण पाणी पुरवठा योजने अंतर्गत ५० लाख रुपये पाणी पुरवठा योजनेसाठी मंजूर करण्यात आले. या अगोदर सन २००१-०२ या वर्षा पासून या गावात जलस्वराज प्रकल्पांतर्गत चांदोरी खुर्द येथुन परसवाडा पर्यंत संपूर्ण गावात पाणी पुरवठा योजना सुरू होती.
सन २०१०-११ मध्ये ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत तत्कालीन सरपंच व सध्याचे उपसरपंच मनिराम हिंगे यांनी ५० लाख रुपयाची योजना राबवितांना अनेक ठिकाणी पाईप लाईन नवीन न खोदता बिले मंजूर करून घेतली. शिल्लक असलेले १ हजार फूट पाईप स्वत:च्या शेती मध्ये उपयोगात आणले असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. माहितीच्या अधिकारीखाली मिळालेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी पाईप लाईन खोदली नाही व नवीन पाईप लावलेच नाही तरी देखील ग्रामविकास अधिकारी तुरकर यांनी मोजमाप पुस्तीके मध्ये नोंद केली व बिलाची उचल केली आहे.
नागरिक श्रीपत ठवकर व घनश्याम ठवकर यांच्या घरापर्यंत पाणी पुरवठा पाईप लाईन असुन सुद्धा घरेलू पाणी पुरवठ्याची जोडणी केली. ग्राम विकास अधिकारी यांनी नामंजूर केली. उपसरपंच मनिराम हिंगे यांच्या शेतावरील बोरवेलच्या पाईपला ग्राम पंचायतची पाईप लाइन जोडून विद्युत वितरण कंपनी परसवाडा यांनी खाजगीरित्या मासिक दराने पाणी पुरवठा केला आहे.
ग्रा. पं.द्वारे खरेदी केलेल्या मोटारपंपचा उपयोग उपसरपंच स्वत:च्या शेतीसाठी करीत असल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणने आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत निधी आली व योजना कार्यान्वीत असतांना सुद्धा ग्राम विकास अधिकारी तुरकर हे नळ देण्यास तयार नाही व त्यांच्या घराजवळून पुढील विज वितरण कंपनीला पाणी देत आहेत. नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या नंतर कुणालाही पाणी द्या. असा सूर गावकऱ्यांचा आहे.
ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत कामात अनेक प्रकारचे गैरव्यवहार झाले. ही माहितीे माहितीच्या अधिकारातून मिळाली. संबंधीत कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून येथील नागरिकांना न्याय देण्यात यावे, अशी तक्रारकर्त्यांची मागणी आहे. (वार्ताहर)