जिल्हा दूध संघाच्या कारभारात अनियमितता

By Admin | Published: September 10, 2014 11:47 PM2014-09-10T23:47:39+5:302014-09-10T23:47:39+5:30

गोंदिया जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजकुमार कुथे यांच्यासह इतर संचालकांवर कारभारात अनियमितता असून आर्थिक व्यवहारात गडबड झाल्याचा ठपका दूग्धविकास मंत्रालयाने ठेवला आहे.

Irregularity in the management of district milk team | जिल्हा दूध संघाच्या कारभारात अनियमितता

जिल्हा दूध संघाच्या कारभारात अनियमितता

googlenewsNext

गोंदिया : गोंदिया जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजकुमार कुथे यांच्यासह इतर संचालकांवर कारभारात अनियमितता असून आर्थिक व्यवहारात गडबड झाल्याचा ठपका दूग्धविकास मंत्रालयाने ठेवला आहे. त्यामुळे व्याजासह एकूण ३ लाख ६ हजार २४७ रुपये संबंधितांकडून वसूल करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
याप्रकरणी प्राप्त माहितीनुसार, वर्ष २०१०-११ मधील आॅडिट रिपोर्टमध्ये उपंिनबंधक (दूग्धव्यवसाय) यांनी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजकुमार कुथे तसेच संचालक दयाराम कापगते, श्रीराम खरे, लक्ष्मण भगत, सूर्यभान टेंभुरकर, राजाराम लांजेवार, हिवेश्वरी चौधरी, निशा राठोड, व्यवस्थापक कल्पना बोकडे आदींवर ठपका ठेवला होता. त्यात कुथे यांनी आपल्या मालकीच्या गाडीच्या नावावर १ लाख ३० हजार ३३२ रुपयांचे डिझेल बिल सादर करून ते पैसे वसूल केले होते. तसेच इतर गाड्यांसाठी १ लाख ७५ हजार ९१४.७९ रुपयांचे बिल वसूल केल्याबद्दल आक्षेप घेण्यात आला होता. उपनिबंधकांनी यानंतर ही रक्कम त्या संचालकांकडून वसूल करण्याचे आदेश दिले होते. परंतू राजकुमार कुथे यांनी त्यावर सहनिबंधकांकडून अपिल केले. त्यांनी ते आक्षेप खारिज केल्यानंतर दूध संघाचे एक संचालक प्रेमकुमार जयस्वाल यांनी दूग्धविकास मंत्रालयाकडे अपिल करून दोषींवर कारवाईची मागणी केली होती. त्यावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी बिलाची वसुली करण्याचा निर्णय कायम ठेवला. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Irregularity in the management of district milk team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.