८ हजार एकर जमिनीला सिंचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 09:19 PM2018-11-19T21:19:10+5:302018-11-19T21:19:23+5:30
क्षेत्राच्या विकासाची जबाबदारी जनतेने आमच्यावर टाकली असून आपल्या जबाबदारीचे वहन करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. ग्रामीण भागात शेतकरी समृद्ध असणे गरजेचे आहे. त्यामुळेच क्षेत्रात सिंचनाची सोय वाढविण्याच्या दृष्टीने आम्ही कार्य करीत आहोत. यंदा तेढवा-सिवनी उपसा सिंचन योजनेमुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळाला. मात्र योजना पूर्ण झाल्यावर ८ हजार एकर जमिनीला सिंचन होणार असल्याचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी सांगीतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : क्षेत्राच्या विकासाची जबाबदारी जनतेने आमच्यावर टाकली असून आपल्या जबाबदारीचे वहन करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. ग्रामीण भागात शेतकरी समृद्ध असणे गरजेचे आहे. त्यामुळेच क्षेत्रात सिंचनाची सोय वाढविण्याच्या दृष्टीने आम्ही कार्य करीत आहोत. यंदा तेढवा-सिवनी उपसा सिंचन योजनेमुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळाला. मात्र योजना पूर्ण झाल्यावर ८ हजार एकर जमिनीला सिंचन होणार असल्याचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी सांगीतले.
तालुक्यातील ग्राम माकडी येथील मंडई मेळ््याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे उपस्थित होत्या.
याप्रसंगी सभापती हरिणखेडे यांनी, परंपरेनुसार दरवर्षी गावागावांत आयोजीत मंडई मेळे आमची वर्षानुवर्षे जुनी ग्रामीण संस्कृती पुढे घेऊन जाण्याचे माध्यम असल्याचे मत व्यक्त केले. मात्र आज हे मंडई मेळे काहींनी आपल्या भडास काढण्याचे माध्यम बनविल्याचे मत व्यक्त केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष मडावी यांनी, आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील ५६ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांत आयुर्वेदीक डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून १० नवीन उपकेंद्र स्थापित केले जात असल्याचे सांगीतले. कार्यक्रमाला प्रमिला करचाल, त्रीवेणी हनवते, डॉ. राजेंद्र गाते, गोविंद तुरकर, रमेश नशिने, जगतराय बिसेन, रानू पशिने, मदनलाल हनवते, धुर्वराज उके, दिलीप ठाकरे, संगीता रहांगडाले, विद्या भोयर, रूद्रसेन खांडेकर, डिगंबर तुरकर, मंगल ठाकरे, सी.ए.रहांगडाले, सविता भगत, जीवनसिंह सोलंकी, सुभाषचंद्र नागपुरे, डॉ. राजू तुरकर, रोशन लिल्हारे, खेमनसिंह सोलंकी, नितीन तुरकर, बंटी तुरकर, संगीता भगत, यादोराव करचाल, विलास भालाधरे, भागरता उईके, जेवंता उईके, विद्या भालाधरे, उर्मिला खांडवाहे, योगराज तुरकर, झनकलाल उईके, अमृतलाल भालाधरे, प्रकाश रंगारी व गावकरी उपस्थित होते.