जीर्ण इमारतीतून सिंचन विभागाचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 01:00 AM2018-06-21T01:00:16+5:302018-06-21T01:00:16+5:30

येथील सिव्हिल लाईन परिसरात सिंचन विभागाच्या कार्यालयाची इमारत असून ती पूर्णपणे जीर्ण झाली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने ही इमारत केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Irrigation Department's management from a dilapidated building | जीर्ण इमारतीतून सिंचन विभागाचा कारभार

जीर्ण इमारतीतून सिंचन विभागाचा कारभार

Next
ठळक मुद्देदुरूस्तीकडे विभागाचे दुर्लक्ष : ईमारत कोसळण्याचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील सिव्हिल लाईन परिसरात सिंचन विभागाच्या कार्यालयाची इमारत असून ती पूर्णपणे जीर्ण झाली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने ही इमारत केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र इमारतीच्या दुरूस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत आहे.
येथील सिंचन विभागाचे कार्यालय आता जीर्ण झालेले आहे. या विभागाच्या कार्यकारी अभियंत्याचे कार्यालय ज्या भागात आहे, त्याच भागातील भिंतीला एक मोठी भेग पडली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत ही इमारत कधीही कोसळू शकते. या इमारतीतील काही विभाग इतत्र हलविण्यात आले. मात्र काही विभागाचे काम अजूनही याच इमारतीतून सुरू आहे. इमारत कोसळण्याचा धोका ओळखून भिंतीला टेकू लावण्यात आला आहे. विशेष ईमारत बरीच जुनी असून या विभागाशी शेतकऱ्यांचा नेहमी संबंध येतो. त्यामुळे या परिसरात नेहमी वर्दळ असते. इमारत जीर्ण झाली असता देखील संबंधित विभागाने तिच्या दुरूस्तीसाठी अद्यापही पाऊल उचलले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गोंदिया सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून काही काळापूर्वी ए.के.ढोरे कार्यरत होते. एका आमदाराने त्यांची तक्रार केली होती. त्या तक्रारीमुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत सदर पद रिक्त आहे. या पदाचा प्रभार वाघ-इटियाडोह सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता एच.वाय. छप्परघरे यांना सोपविण्यात आला आहे. ढोरे जेथे बसत होते त्या कक्षातच मोठी भेग (फट) तयार झाली आहे. या इमारतीची स्थिती पाहून खाली बांबू-बल्ली लावून त्याला आधार देण्यात आला आहे. काही कर्मचारी अद्यापही या इमारतीत बसून काम करतात.

Web Title: Irrigation Department's management from a dilapidated building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.