जिल्हा परिषदचे सिंचन ७९८ प्रकल्प रखडलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 06:00 AM2019-11-04T06:00:00+5:302019-11-04T06:00:13+5:30

गोंदिया जिल्ह्यातील ६३ हजार ७०७ हेक्टर शेती सिंचित होऊ शकेल एवढ्या क्षमतेचे प्रकल्प एकट्या जिल्हा परिषदेकडे आहेत. परंतु ह्या प्रकल्पांची दुरूस्ती मागील अनेक वर्षापासून न झाल्यामुळे तलावाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाण्याअभावी आपली शेतीला सिंचित करता येत नाही.

Irrigation projects of Zilla Parishad are laid | जिल्हा परिषदचे सिंचन ७९८ प्रकल्प रखडलेले

जिल्हा परिषदचे सिंचन ७९८ प्रकल्प रखडलेले

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात ३५२९ तलाव : दुरुस्तीसाठी ७० कोटींची गरज, शेतकऱ्यांना सिंचनाची होऊ शकते मदत

नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासन एकीकडे सिंचन क्षमता वाढविण्यासाठी किंवा भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबवित आहे. परंतु तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील ७९८ प्रकल्प पैश्याअभावी रखडले आहेत. जिल्ह्यात लघु पाटबंधारे विभागामार्फत सिंचनासाठी ३ हजार ५२९ प्रकल्प आहेत. त्यापैकी ७८९ प्रकल्प रखडले असल्याने तलावांच्या जिल्ह्यात पाण्याचा दुष्काळ आहे.
गोंदिया जिल्ह्यातील ६३ हजार ७०७ हेक्टर शेती सिंचित होऊ शकेल एवढ्या क्षमतेचे प्रकल्प एकट्या जिल्हा परिषदेकडे आहेत. परंतु ह्या प्रकल्पांची दुरूस्ती मागील अनेक वर्षापासून न झाल्यामुळे तलावाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाण्याअभावी आपली शेतीला सिंचित करता येत नाही. शासन जलयुक्त शिवार अभियानाचा गाजावाजा करीत आहे. परंतु या रखडलेल्या या प्रकल्पांची कामे करण्यास उत्सुकता दाखवित नसल्याचे चित्र सद्या उभे आहे. १९० लघु सिंचन तलावपैकी ८८ नादुरूस्त, २९४ कोल्हापुरी बंधाऱ्यांपैकी ७० नादुरूस्त, १३ उपसा सिंचनापैकी ९ उपसा सिंचन नादुरूस्त, २६ पाझर तलाव आहेत ते संपूर्ण दुरूस्त आहेत.१५४५ साठवण बंधाऱ्यांपैकी १०६ नादुरूस्त, माजी मालगुजारी १४२१ तलावांपैकी ५२५ तलाव नादुरूस्त असल्याची माहिती संबधित विभागाने दिली. यामुळे सिंचनाच्या सोयी करण्यास शासन कसा उदासिन आहे याची प्रचिती येते.
गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण करणारा असला तरी या जिल्ह्यातील बहुतांश शेती कोरडवाहू आहे. शेतकºयांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी सोयीस्कर म्हणून माजी मालगुजारी तलाव आहेत. परंतु गोंदिया जिल्ह्यातील ८० टक्के मामा तलावांमध्ये उन्हाळ्यात पाण्याचा ठणठणाट असतोे.गोंदिया जिल्ह्यातील १४२१ माजी मालगुजारी तलावांपैकी ५२५ तलावांची दुरूस्ती करण्याची गरज आहे. परंतु दुरूस्ती न झाल्यामुळे शेतकºयांना सिंचन करण्यासाठी पाणी पुरत नाही.
परिणामी हे मामा तलाव हिवाळ्यातच कोरडे पडतात. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाºया लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित लघुसिंचन तलाव, कोल्हापुरी बंधारे, उपसा सिंचन योजना, पाझर तलाव, साठवण बंधारे व माजी मालगुजारी तलावात दरवर्षीच पाण्याचा ठणठणाट पडतो.

७० कोटीची गरज
शासनाने गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत असलेले सिंचन प्रकल्प दुरूस्त करण्याची तयारी दर्शविली तर ७९८ प्रकल्प दुरूस्तीसाठी ६९ कोटी ८१ लाख रूपयाची गरज आहे. सदर प्रकल्पाची दुरूस्ती झाल्यास १८ हजार ९९७ हेक्टर शेती सिंचीत होऊ शकेल. मामा तलावांची दुरूस्ती झाल्यास ९०२० हेक्टर, लपा तलाव दुरूस्त झाल्यास ५४८२ हेक्टर, पाझर तालवाच्या दुरूस्तीमुळे ३२ हेक्टर, कोल्हापूरी बंधाऱ्यांमुळे ३०८० हेक्टर, साठवण बंधाऱ्यांमुळे ५३३ हेक्टर, उपसा सिंचनामुळे ८५० हेक्टर शेती सिंचीत होऊ शकेल.

१९ हजार हेक्टर शेती सिंचीत
वर्षानुवर्षापासून गोंदिया जिल्ह्यात असलेल्या तलावांमधून आजघडीला १९ हजार २२० हेक्टर शेती सिंचीत होते. मामा तलावांमधून १० हजार ११६ हेक्टर, लपा तलावांमधून ४ हजार ४५८ हेक्टर, कोल्हापूरी बंधाºयांमुळे २ हजार ३९८ हेक्टर, साठवण बंधाºयांमुळे ९९० हेक्टर, उपसा सिंचनामुळे ७५२ हेक्टर शेती सिंचीत होऊ शकते.

Web Title: Irrigation projects of Zilla Parishad are laid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.