पाणीपट्टी वसुलीमध्ये पाटबंधारे उपविभाग गोंदिया विभागात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:30 AM2021-04-04T04:30:06+5:302021-04-04T04:30:06+5:30
सिंचन पाणीपट्टी व बिगर सिंचन पाणीपट्टी वसुलीमध्ये उपविभाग नवेगावबांध गोंदिया पाटबंधारे विभागातुन पहिल्या क्रमांकावर आहे. या उपविभागाने वित्तीय ...
सिंचन पाणीपट्टी व बिगर सिंचन पाणीपट्टी वसुलीमध्ये उपविभाग नवेगावबांध गोंदिया पाटबंधारे विभागातुन पहिल्या क्रमांकावर आहे. या उपविभागाने वित्तीय वर्ष २०२०-२१ मध्ये पाणीपट्टीचे उद्दिष्ट सिंचन ४.७० लक्ष रुपये एवढे होते. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत ५.०९ लक्ष रुपये वसुली करण्यात आली तर बिगर सिंचन वसुली ३.५० लक्ष रुपये उद्दिष्ट होते. वसुली ४.८८ लक्ष रुपये करण्यात आली. एकूण वसुली ८.२० लक्ष रुपये उद्दिष्ट होते. मात्र या उपविभागाने ९.९७ लक्ष एवढी विक्रमी वसुली करून गोंदिया विभागात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. विक्रमी वसुलीची १२९.५९ टक्केवारी आहे. समीर बनसोडे उपविभागीय अभियंता यांच्या मार्गदर्शनात कनिष्ठ अभियंता डहाणे, भेलावे व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.