जिल्ह्यातील १,८२० रिक्षाचालकांच्या ‘रोटी’चा प्रश्न मिटला; इतरांचे काय? (डमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:27 AM2021-04-15T04:27:56+5:302021-04-15T04:27:56+5:30

गोंदिया : डिझेल व पेट्रोलच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाने संपविलेल्या रोजगारावर आणखीनच संकट ओढवण्याचे काम पेट्रोल ...

The issue of 'bread' of 1,820 rickshaw pullers in the district has been resolved; What about others? (Dummy) | जिल्ह्यातील १,८२० रिक्षाचालकांच्या ‘रोटी’चा प्रश्न मिटला; इतरांचे काय? (डमी)

जिल्ह्यातील १,८२० रिक्षाचालकांच्या ‘रोटी’चा प्रश्न मिटला; इतरांचे काय? (डमी)

Next

गोंदिया : डिझेल व पेट्रोलच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाने संपविलेल्या रोजगारावर आणखीनच संकट ओढवण्याचे काम पेट्रोल व डिझेल दरवाढीने केले आहे. त्यातच पुन्हा दुसरे लॉकडाऊन झाल्याने सरकारने मदत करण्याचे ठरविले. ही राज्य सरकारची मदत जिल्ह्यातील १,८२० रिक्षाचालकांना होणार आहे. कोरोनामुळे एकमेकांच्या जवळ येऊ नका, दाटीवाटीने प्रवास करू नका, अशा सूचना प्रशासनाने दिल्यामुळे ऑटो व्यावसायिक संकटात आले. कोरोनाच्या संसर्गामुळे दुसरे लॉकडाऊन करण्यात आले अन्‌ ऑटो बंद झाले. शासनाकडून मदत मिळेल; पण ती मदत तुटपंजी असल्याने घर चालविणे शक्य होणार नाही.

कोट

कोरोनाच्या संसर्गामुळे लोक अधिक पैसे खर्च करून स्वत:च्या वाहनाने प्रवास करू लागले. आता पुन्हा लॉकडाऊन झाल्याने आमचा रोजगार संपला. शासन ऑटोचालकांना मदत करायचे म्हणत आहे; परंतु आतापर्यंत आम्हाला कसलीच मदत मिळाली नाही.

-नंदू लांजेवार, खमारी

....

कोरोनाचा संसर्ग पुन्हा जोमाने सुरू झाला तेव्हापासून आतापर्यंत आमच्या रोजगारावर संकट आले. आधी आपली रोजी-रोटी चांगली सुरू होती; परंतु आता ऑटोरिक्षाकडे ग्राहकच भटकत नाही. आम्हाला आता रिक्षा बंद करावा लागला. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा प्रश्न आम्हाला पडला आहे. शासनाची मदत तोकडीच असेल.

-सतीश समुद्रे,

अध्यक्ष, ऑटो रिक्षाचालक संघटना

.....

पहिल्या लॉकडाऊननंतर बहुतांश रेल्वेगाड्या बंद असल्याने रेल्वेस्थानकावरून येणाऱ्या प्रवाशांची संख्या नाहीच्या तुलनेत होती. त्यामुळे लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही धंदा मंदच होता. आता पुन्हा ऑटो बंद झाल्याने पोट कसे भरणार? मिळणारी मदत कमी प्रमाणातच असेल त्यातून कुटुंबाचे काय भागणार आहे.

-राजेश ठाकूर, रिक्षाचालक

.........

जिल्ह्यातील परवानाधारक रिक्षा- १,८२०

Web Title: The issue of 'bread' of 1,820 rickshaw pullers in the district has been resolved; What about others? (Dummy)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.