सापांना जंगलात सोडणे घातकच

By admin | Published: August 19, 2015 02:01 AM2015-08-19T02:01:36+5:302015-08-19T02:01:36+5:30

दरवर्षी नागपंचमीला नागाची पूजा केली जाते. अनेक ठिकाणी नागराजाची मूर्ती बसवून मंदिर उभारले जातात...

It is dangerous to leave the snake in the forest | सापांना जंगलात सोडणे घातकच

सापांना जंगलात सोडणे घातकच

Next

नाग शेतकऱ्यांचा मित्र : सापांबाबत नागरिकांचे समज-गैरसमज
विजय मानकर  सालेकसा
दरवर्षी नागपंचमीला नागाची पूजा केली जाते. अनेक ठिकाणी नागराजाची मूर्ती बसवून मंदिर उभारले जातात व नाग देवतेचे पूजन केले जाते. परंतु प्रत्यक्षात साप दिसला की त्याला धोकादायक समजून त्याला ठार केल्याशिवाय मनुष्य श्वास घेत नाही, अशीही काही लोकांची मानसिकता असून ती मोठीच शोकांतिका आहे.
साप हा सरपटणारा प्राणी असून जमिनीतील छिद्रांमध्ये त्याचे वास्तव्य असते. स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी जमिनीत लपून असला तरी तो आपल्या भोजनाच्या शोधात सतत इकडे-तिकडे सरपटत असतो. या दरम्यान तो मानव जातीच्या नजरेस पडला की त्याचा मृत्यू ओढवल्याशिवाय राहत नाही. काही सर्पमित्र सापाला पकडून मारणाऱ्यांच्या ताब्यातून सोडवतात व त्याला जंगलात नेवून सोडतात.
साप खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा मित्र ठरतो. शेतात राहणारे उंदिर, बेडूक आदी जीव-जंतूंना आपला आहार बनवितो. बेडूक हा शेतात पिकांवरील किडींचे भक्षण करतो. त्यामुळे शेतात बेडूक आवश्यक आहे. बेडकांचे प्रमाण वाढले तर त्याचे भक्षण साप करतो. सापांचे प्रमाण वाढले तर त्या परिसरात सापांचे भक्षण करणारे मुंगूस यासारखे प्राणीसुद्धा येतात. अशाप्रकारे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या पिकांचे संरक्षण सापांच्या माध्यमातून होत असते. या सर्व बाबी शेतकऱ्यांना माहीत असूनही काही लोक साप दिसला की विशेषकरून नाग सापाला ताबडतोब मारून टाकतात.
खरे पाहिले तर कोणताही साप स्वत:हून माणसाला डंख मारत नाही. उलट तो खूप भित्रा प्राणी आहे. मनुष्य दिसला की किंवा स्पंदनाने आभास होताच तो जोराने सरपटत पळ काढतो. जेव्हा सापाला असे वाटते की आपल्यावर हल्ला होत आहे किंवा आपल्या शरिराला इजा पोहचत आहे, तेव्हाच तो आत्मरक्षणासाठी डंख मारतो.
परंतु तो माणसाचा शत्रू मुळीच नसून प्रत्येकाने सापाला जीवनदान देण्याचा प्रयत्न करावा.
शेत, गाव परिसर व जंगलातील
सापांच्या आहारात भिन्नता
गाव परिसरात आढळणाऱ्या सापांचे रंग व आहाराचे प्रकार गाव परिसरात मिळणाऱ्या कीटकांवर अवलंबून असतात. तर शेतात राहणारा साप शेतात आढळणाऱ्या बेडूक व इतर कीटकांवर अवलंबून असतो. जंगलात राहणारा साप तेथील रंग व मिळणाऱ्या आहारावर अवलंबून असतो. सर्व प्रकारच्या सापांमध्ये मोठी विविधता असते. त्यामुळे गाव परिसरात राहणाऱ्या सापाचे जंगल परिसरातील हवामानात जगणे कठीण असते. तर जंगलात वावरणारा साप इतर भागात जाऊन जीवन जगणे त्याला सोईस्कर ठरत नसते. त्यामुळे गावात आढणाऱ्या सापाला मारले, तर ती प्रजात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. परंतु जर त्याला जंगलात नेऊन सोडले तर तो तेथे जिवंत राहणार नाही किंवा इतर कीटकांशी लढा देऊ शकणार नाही. त्यामुळे गावातील साप पकडून त्याला जंगलात सोडण्यापेक्षा त्याला त्याच परिसरात मोकळ्यापणाने जाऊ देणे सापांच्या प्रती खरी मित्रता ठरेल. तसेच काही गारूडी लोक सापांना पकडून गावागावात फिरवतात व पोटपाण्याचे साधन बनवितात. परंतु ते साप त्यांच्याजवळ जिवंत राहू शकत नाही.

Web Title: It is dangerous to leave the snake in the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.