जनतेचा ‘तो’ निर्णय ठरत आहे क्षेत्राच्या विकासात बाधक ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:17 AM2021-02-22T04:17:48+5:302021-02-22T04:17:48+5:30
गोंदिया : ग्रामपंचायत निवडणुकीत काहींनी विधानसभा क्षेत्रातील १५-१५ ग्रामपंचायतींवर विजय मिळविल्याचा दावा केला होता. मात्र आज या कार्यक्रमात २० ...
गोंदिया : ग्रामपंचायत निवडणुकीत काहींनी विधानसभा क्षेत्रातील १५-१५ ग्रामपंचायतींवर विजय मिळविल्याचा दावा केला होता. मात्र आज या कार्यक्रमात २० ग्रामपंचायतीचे सरपंच-उपसरपंच उपस्थित असून त्यांनी अशांचा दावा खोटा ठरविला आहे. हे जनतेने आता खोट्या उकसाव्यांना मागे सोडून पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर चालण्याचे मन बनवून घेतल्याचे प्रमाण आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळीही असाच खोटा प्रचार करण्यात आला होता व त्यावेळी जनतेने घेतलेला निर्णयच आज क्षेत्राच्या विकासात बाधक ठरत असल्याचे प्रतिपादन माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्यावतीने आयोजित शहर-ग्रामीण कार्यकर्ता मेळावा व नवनिर्वाचित सरपंच-उपसरपंच सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष केशव मानकर होते. याप्रसंगी प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व विदर्भ प्रदेश संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना अग्रवाल यांनी, क्षेत्रातील कित्येक विकास कामे आज मंजुरीनंतरही ठप्प पडून आहेत. भूमिगत गटार योजनेचे काम कमिशनखोरीमुळे कासव गतीने सुरू आहे. या सर्व विषयांना घेऊन आम्ही जनतेत गेलो व २९ मधील २० ग्रामपंचायतींवर जनतेने आम्हाला आशीर्वाद देऊन ते विकासाच्या सोबत असल्याचे दाखवून दिल्याचे सांगितले.
याप्रसंगी डॉ.कोठेकर यांनी गोपालदास अग्रवाल भाजप संघटनेसोबत जुळल्याने ‘एक और एक ग्यारह’ झाले असून यामुळेच गोंदिया विधानसभा क्षेत्रातील २० ग्रामपंचायतींवर भाजपने विजय मिळविला असे मत व्यक्त केले. बावनकुळे यांनी, भाजप लोकहिताचे कार्य करणारा पक्ष आहे. भाजपला राज्यात सरकार बनविण्याची घाई नाही. मात्र तीन चाकांचा हा महाविकास आघाडीचा टेम्पो आपल्या कर्मांनीच पडणार व निश्चितच भाजप सरकार बनविणार असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला माजी मंत्री राजकुमार बडोले, आमदार विजय रहांगडाले, प्रदेश उपाध्यक्ष हेमंत पटले, माजी आमदार संजय पुराम, माजी आमदार रमेश कुथे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, संपर्क प्रमुख विरेंद्र अंजनकर, माजी आमदार भेरसिंग नागपुरे, माजी आमदार खोमेश रहांगडाले, अशोक चौधरी, नंदू बिसेन, संजय कुलकर्णी, नेतराम कटरे, प्रकाश रहमतकर, भावना कदम, संतोष चव्हाण, दिनेश दादरीवाल, पारस पुरोहित, जितेंद्र पंचबुद्दे, राजकुमार नोतानी, नरेंद्र तुरकर, संजय टेंभरे, सुनील केलनका, धनलाल ठाकरे, माधुरी हरिणखेडे, निर्मला मिश्रा, पलाश लालवानी, सुमित महावत यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------------------
या सरपंच-उपसरपंचांचा केला सत्कार
कार्यक्रमात गोपलदास अग्रवाल, तालुका ग्रामीण अध्यक्ष धनलाल ठाकरे व शहर अध्यक्ष सुनील केलनका यांच्याकडून पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर समस्त पाहुण्यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच-उपसरपंचांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये, ग्राम चिरूटोलाचे सरपंच तपेश सोनवाने व उपसरपंच लता पाचे, चंगेराचे सरपंच लालसिंग पंधरे, बिरसोलाचे सरोजनी दंदरे व डॉ.देवलाल जमरे, सावरीच्या माधुरी पटले व टेकचंद दमाहे, घिवाचीच्या सुगरता फरकुंडे व मंगल सुलाखे, फुलचूरटोलाच्या कोमल धोटे व दिनेश चित्रे, कटंगटोलाचे हनसलाल उईके व शाहीन मिर्झा, हिवराचे ब्रिजलाल मारगाहे व राजेश परिहार, बलमाटोलाचे रूवेंद्र पाचे, उपसरपंच रेखा मेश्राम, नवेगाव (पा) उषा सुलाखे व जितेश गौतम, रावणवाडीच्या शीला वासनिक व पन्नालाल हरिणखेडे, छिपीयाच्या अनामिका बहेकार व अनमोल उके, परसवाडाच्या रेखा पारधी व संतोष हनवते, फुलचूरचे मिलन रामटेक्कर व सुरेश सोनवाने, गिरोलाचे प्रकाश तांडेकर व प्रदीप न्यायकरे, कासाच्या कृष्णी मरठे व मोहपत खरे, काटीच्या सरपंच सुषमा उईके, लोधीटोलाचे संजय ठाकरे व देवेंद्र बघेले, बघोलीचे तिजू पाचे व चित्रकला चव्हाण, धापेवाडाचे प्रकाश कटरे व मारोती रहांगडाले, लोधीटोला (धा) उपसरपंच थानीराम माहुले, फतेपूरच्या वनिता बघेले व धनंजय रिनायत तसेच ग्राम चुटिया, खमारी, मोगर्रा, बनाथर, कोरणी, सेजगाव व खर्रा येथील ग्रामपंचायत सदस्यांचाही सत्कार करण्यात आला.