केवळ बुद्धिमत्ता नव्हे कर्तृत्व महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 11:36 PM2018-08-01T23:36:48+5:302018-08-02T00:00:26+5:30

प्रशासकीय सेवेत काम करतांना बरेच अनुभव आले. केवळ पुस्तकी अभ्यास म्हणजे बुद्धिमत्ता नव्हे तर कर्तृत्व महत्त्वाचे आहे. मेंदू चांगला असेल तर प्रत्येक व्यक्ति बुद्धिवंत आहे. कुठल्याही क्षेत्रात कॅरिअर घडवितांना आधी स्वत:ला ओळखा.

It is not only intelligence but criticalness | केवळ बुद्धिमत्ता नव्हे कर्तृत्व महत्त्वाचे

केवळ बुद्धिमत्ता नव्हे कर्तृत्व महत्त्वाचे

Next
ठळक मुद्देअविनाश धर्माधिकारी : कॅरिअर व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळावा, फार्च्यून फाऊंडेशन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : प्रशासकीय सेवेत काम करतांना बरेच अनुभव आले. केवळ पुस्तकी अभ्यास म्हणजे बुद्धिमत्ता नव्हे तर कर्तृत्व महत्त्वाचे आहे. मेंदू चांगला असेल तर प्रत्येक व्यक्ति बुद्धिवंत आहे. कुठल्याही क्षेत्रात कॅरिअर घडवितांना आधी स्वत:ला ओळखा. आपल्या आवडत्या क्षेत्रात उडी घेतल्यानंतर यशस्वी होण्यासाठी घेतलेले कठोर परिश्रम हेच यशाचे रहस्य असल्याचे प्रतिपादन चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक संचालक अविनाश धर्माधिकारी यांनी केले.
फार्च्यून फाऊंडेशन व चाणक्य मंडळ परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कॅरिअर आणि स्पर्धा परीक्षा या विषयावर मंगळवारी (दि.३१) येथील जलाराम बाप्पा लॉनच्या सभागृहात मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
याप्रसंगी फार्च्यून फाऊंडेशनचे अध्यक्ष आमदार प्रा.अनिल सोले, शिक्षक आमदार ना.गो.गाणार, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, कार्यक्रमाचे संयोजक भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विनोद अग्रवाल, नगराध्यक्ष अशोक इंगळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अल्ताफ हमिद, सभापती विश्वजीत डोंगरे, शैलजा सोनवाने, आशीष वांदिले, भाजपा जिल्हा महामंत्री संघटन वीरेंद्र अंजनकर, भाऊराव ऊके, शहर अध्यक्ष सुनील केलनका, महिला मोर्चा प्रदेश सचिव सीता रहांगडाले, ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव वीरेंद्र जायसवाल, माजी जि.प.अध्यक्ष रजनी नागपुरे, भाजयुमो जिल्हा अध्यक्ष पंकज रहांगडाले, जिल्हा संपर्क प्रमुख संजय कुलकर्णी, नगरसेवक भरत क्षत्रिय, विद्यार्थी मोर्चा जिल्हाध्यक्ष समीर आरेकर उपस्थित होते. या वेळी धर्माधिकारी यांनी, स्पर्धा परीक्षा, मुलाखत प्रक्रिया, व्यक्तिमत्व विकास व कॅरिअर घडविणाऱ्या अनेक महत्वपूर्ण क्षेत्रांची विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. प्रशासकीय सेवा हे देशसेवेचे माध्यम असल्याचे सांगून दरवर्षी गोंदिया येथे या कार्यक्रमासाठी येणार असल्याची ग्वाही दिली. सोले म्हणाले, भारतीय प्रशासकीय सेवेत उच्च पदावर कार्य केलेले अविनाश धर्माधिकारी हे तरुणाचे आयुष्य घडविन्याचे काम करीत आहेत. जिल्ह्यात त्यांच्या मार्गदर्शनाने युवकांना कॅरिअरच्या योग्य दिशा नक्कीच सापडतील.फार्च्यून फाऊंडेशनतर्फे१० सप्टेंबरला गोंदिया येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. अनेक कंपन्याच्या माध्यमातून मुलाखत घेऊन निवड प्रक्रिया राबविली जाणार असल्याची घोषणा केली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून विनोद अग्रवाल यांनी कॅरिअर व स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शन गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी मौलाचे ठरणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सविता बेदरकर यांनी केले.

Web Title: It is not only intelligence but criticalness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.