तथागत बुद्धांच्या विचारांनीच जग जिंकण्याची प्रेरणा मिळते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:22 AM2021-05-28T04:22:22+5:302021-05-28T04:22:22+5:30
अर्जुनी-मोरगाव : या जगात बुद्धांचा जन्म झाला नसता, तर मानवाला सुख-समाधानाची प्राप्ती झाली नसती. प्रज्ञा, शील, करुणा, सम्यक, ...
अर्जुनी-मोरगाव : या जगात बुद्धांचा जन्म झाला नसता, तर मानवाला सुख-समाधानाची प्राप्ती झाली नसती. प्रज्ञा, शील, करुणा, सम्यक, सन्मानमार्ग या तत्त्वानेच मानवाला उत्तम जीवन जगता आले. मानवाचे कर्म हेच माणसाला खाऊन टाकते आणि विकृती निर्माण होऊन वैमनस्य होत असते. बुद्धांनी गृहत्याग करून मानवाचे दु:ख शोधले. अशा अनेक कार्य व विचारांनी माणसे घडली आहेत. म्हणूनच, भगवान गौतम बुद्धांच्या विचारांनीच जग जिंकण्याची प्रेरणा मिळत आहे, असे प्रतिपादन कवी व आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक मुन्नाभाई नंदागवळी यांनी केले.
बुद्ध जयंतीनिमित्त लोककला साहित्य सेवाभावी बहुउद्देशीय संस्था येरंडी-बाराभाटी व परिवर्तनशील साहित्य महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाइन सृजनशील वैचारिक कविसंमेलनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. बौद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित जयंती कार्यक्रम आणि सृजनशील वैचारिक कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील नामवंत कवी व साहित्यिक इ.मो. नारनवरे होते. उद्घाटन नांदेडचे प्रसिद्ध लेखक व विचारवंत प्रा.डॉ. सुद्धोधन कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यामध्ये संतोष रामचंद्र गमरे (मुंबई), राहुल शेंडे (चूरमुरा-गडचिरोली), श्रावण सखुबाई रंगनाथ (जालना), प्रा. शीलवंतकुमार मडामे (भंडारा), अनुपमा जाधव (पालघर), सुभाष साबळे (अहमदपूर), उमा किशोर गजभिये (गोंदिया), निर्मला पुंडलिकराव भामोदे (अकोला), प्रा. रत्नाकर सुखदेवे (भंडारा), किशोरकुमार बन्सोड (गोंदिया), मुरहारी पारकर (लातूर), राहुल दहिवले (गडचिरोली), संदीप मेश्राम (गोंदिया), सोनाली सहारे, संगीता उमाकांत घोडेस्वार (चंद्रपूर), सुरेश मोटघरे (गडचिरोली), सिद्धार्थ चौधरी, होमराज जांभूळकर (भंडारा), देवेंद्र निकुरे (नागभीड), केवल पी. ऊके, रजनी ताजने, नीरज आत्राम, निर्दोष दहिवले, काव्यरत्न रावसाहेब राशीनकर (अहमदनगर) आदी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या नामवंत व नवोदित कवींनी सहभाग घेत बुद्धांचे विचार व तत्त्वज्ञान, कविता सादर केल्या. संचालन सीमा भसारकर यांनी केले. आभार सुकेशिनी बोरकर यांनी मानले.