अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जेलभरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 01:10 AM2019-02-14T01:10:03+5:302019-02-14T01:10:34+5:30

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समिती आणि महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) नेतृत्वात शेकडो अंगणवाडी सेविकांनी बुधवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून जेलभरो आंदोलन करुन स्वत:ला अटक करुन दिली.

Jail Bharo movement of the Aganwadi workers | अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जेलभरो आंदोलन

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जेलभरो आंदोलन

Next
ठळक मुद्देसीईओला दिले निवेदन : वाढीव मानधन १ आॅक्टोबर २०१८ पासून लागू करा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समिती आणि महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) नेतृत्वात शेकडो अंगणवाडी सेविकांनी बुधवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून जेलभरो आंदोलन करुन स्वत:ला अटक करुन दिली.
जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविका, मदतनिस यांनी शहरातील जयस्तंभ चौकातून बुधवारी दुपारी १ वाजता जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. मोर्चात सहभागी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांना घेवून विद्यमान सरकारविरुध्द घोषणाबाजी केली. मोर्चा जिल्हा परिषद कार्यालयासमोर पोहचल्यानंतर अंगणवाडी सेविकांनी निदर्शने केली. यावेळी जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी मोर्चाला संबोधीत केले. यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी राजा दयानिधी यांना देण्यात आले. या वेळी दिलेल्या निवेदनातून केंद्र शासनाने १ आॅक्टोबर २०१८ पासून जाहीर केलेल्या मानधनातील वाढ महाराष्ट्रात एरियससह देण्यात यावी, सेवा समाप्त सेविका मदतनिस यांना एकमुस्त रक्कम देण्यात यावी, अमृत आहारचे थकीत बिल देण्यात यावे, प्रवास भत्याची प्रलंबित रक्कम देण्यात यावे, अंगणवाडी सेविका-मदतनिसांचे रिक्त पदे भरण्यात यावी या मागण्यांचा समावेश होता. यानंतर मोर्चात सहभागी सर्व अंगवाडी सेविकांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर स्वत:ला अटक करून देत जेलभरो आंदोलन केले.आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष कल्पना पटले, कोषाध्यक्ष मिरा मेश्राम, सचिव रिता शहारे, हौसलाल रहांगडाले, शंकुतला फटींग, आम्रकला डोंगरे, जीवनकला वैद्य, रामचंद्र पाटील, चरणदास भावे, परेश दुरूगवार, सुनिता मलगाम, विना गौतम, वच्छला भोंगाडे, पुष्पा भगत, बिरजूला तिडके, लालेश्वरी शरणागत, अर्चना मेश्राम, पौर्णिमा चुटे, कांचन शहारे, राजलक्षमी हरिणखेडे, विठा पवार, प्रणिता रंगारी, मंजूळा बोरकर, जोत्सना कागदीमेश्राम, चित्रलेखा डोये, सुनिता रहमतकर यांनी केले.

Web Title: Jail Bharo movement of the Aganwadi workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.