कृषी योजनांचा जनजागृती सप्ताह

By admin | Published: July 5, 2015 01:56 AM2015-07-05T01:56:38+5:302015-07-05T01:56:38+5:30

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने तालुक्यात १ ते ७ जुलैपर्यंत कृषी जागृती सप्ताह राबविण्यात येत आहे.

Janajagruti Week of Agriculture Plans | कृषी योजनांचा जनजागृती सप्ताह

कृषी योजनांचा जनजागृती सप्ताह

Next

बोंडगावदेवी : तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने तालुक्यात १ ते ७ जुलैपर्यंत कृषी जागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहाचा शुभारंभ तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, मंडळ कृषी अधिकारी नंदकुमार मुनेश्वर, कृषी पर्यवेक्षक ऋषी चांदेवार, प्रगतीशील शेतकरी कृष्णा शहारे, कुषण झोळे यांच्या उपस्थितीत स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करुन अभिवादन करुन करण्यात आला.
सप्ताहानिमित्त तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कृषीविषयक तंत्रशुद्ध माहिती तसेच कृषी विभागाच्या असलेल्या विविध योजनांची माहिती देत शेतकऱ्यांच्या सर्वांगिण विकास व्हावा यासाठी गावो-गावी शेतकऱ्यांसाठी बैठकांचे आयोजन करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांच्या नेतृत्वाखाली मंडळ निरीक्षक नंदकुमार मुनेश्वर, पर्यवेक्षक आर.के. चांदेवार, एम.बी. ठाकूर, बी.टी. राऊत, बी.एस. हिंगे, कृषी सहायक डी.एम. शहारे, आर.एच. मेश्राम, एन.एन. बोरकर, एस.एन. बोचरे, ए.आर. हुकरे, आर.एन. रहांगडाले, पी.बी. वासनिक, एम.डी. कठाणे, आर.एच. भडके, पी.के. खोटेले, व्ही.आर. औरासे, एफ.एम. कापगते, ए.व्ही. कुथे, बी.पी. डोंगरवार, बी.एन. येरणे, पी.बी. काळे, एस.एफ. ठवकर, एम.टी. येळणे यांनी शेतकऱ्यांना शेतीविषयक तंत्रशुद्ध माहिती दिली.
२ जुलै रोजी मोरगाव, माहुरकुडा, महागाव, वडेगाव/रेल्वे, झरपडा, सिलेझरी, सिरेगावबांध, पवनी धाबे, केशोरी, झाशीनगर, परसटोला, बाराभाटी, नवेगावबांध, देवलगाव, भिवखिडकी , गोठणगाव, चान्ना, प्रतापगड, महालगाव, बोळदे, डोंगरगाव, ताडगाव, सिरोली, नवनितपूर, गुढरी, धाबेटेकडी/पवनी, कन्हेरी, चुटीया, बाक्टी, रामनगर, ३ जुलै रोजी तावशी, बोरी, मालकनपुर, वडेगावबंध्या, कन्हाळगाव, इंझोरी, धाबेटेकडी, जांभळी, गार्डनपूर, तिडका, धमदीटोला, सुकळी, परसोडी (रै.), कवठा, बीडटोला, सुरबन, येरंडी/देवी, तिडका, घुसोबाटोला, मांडोखाल, बुधेवाडा, सोमलपूर येथे बैठक घेण्यात आली.
४ जुलै रोजी खोळदा, सावरी, रामपूरी, दिनकरनगर, इटखेडा, आसोली, जब्बारखेडा, गवर्रा, जुनेवानी येथे घेण्यात आला.
तर ५ जुलै रोजी करांडली, जरुघाटा, निमगाव, बोंडगावदेवी, ईसापूर, कोरंभीटोला, पिंपळगाव, माहुली, डोंगरगाव, भरनोली, खामखुर्रा, कोरंभी, खांबी, चापटी, दाभना, कोहलगाव, उमरपायली, राजोली, पुष्पनगर,/ब., ६ जुलै रोजी विहिरगाव, बोरटोला, अरततोंडी, गौरनगर, येगाव, कान्होली, वारव्ही, सायगाव, देऊळगाव/बोदरा, साकरटोला, अरुणनगर, जानवा, रांजीटोला, अंभोरा. ७ जुलै रोजी आसोली, सुरगाव, सोनेगाव, बोदरा, डोंगरगाव, खडकी या ठिकाणी बैठका घेवून तालुक्यातील कृषी अधिकारी शेतकऱ्यांना विशेष मोलाचे मार्गदर्शन करणार आहे. दरम्यान दुपारी ३ वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी जागृती सप्ताहाची सांगता तालुका कृषी अधिकारी तुमडाम, मंडळ अधिकारी मुनेश्वर, कृषी पर्यवक्षेक चांदेवार, शहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Janajagruti Week of Agriculture Plans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.