जब्बारखेड्यात जनजागरण मेळावा
By Admin | Published: January 24, 2016 01:47 AM2016-01-24T01:47:53+5:302016-01-24T01:47:53+5:30
गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनांतर्गत पोलीस स्टेशन नवेगावबांध व सशस्त्र दूरक्षेत्र धाबेपवनीच्या संयुक्तवतीने जब्बारखेडा येथे दोन दिवसीय भव्य जनजागरण मेळावा घेण्यात आला.
आरोग्य शिबिर : विविध योजनांची दिली माहिती
नवेगावबांध : गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनांतर्गत पोलीस स्टेशन नवेगावबांध व सशस्त्र दूरक्षेत्र धाबेपवनीच्या संयुक्तवतीने जब्बारखेडा येथे दोन दिवसीय भव्य जनजागरण मेळावा घेण्यात आला.
मेळाव्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी (दि.२२) परिसरातील नागरिकांसाठी नि:शुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उद्घाटन कार्यक्रमाला ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र जैन, डॉ. अशोक चौरसिया, अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश येळणे, डॉ. गगण वर्मा, बालरोग तज्ज्ञ डॉ. ठकरानी व डॉ. अनुप अग्रवाल, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पीती बागडे, डॉ. सुषमा बुद्धे, नेत्रचिकित्सक डॉ. निकिता सोयाम, सरपंच संजय खरवडे, सामाजिक कार्यकर्ता नवल चांडक, विजय डोये, ठाणेदार सुनील पाटील, डॉ. सुषमा डोये, डॉ. कुलदिप बघेल, डॉ. भूषण मेंढे आदी मान्यवर उपस्थित होते.
त्याचबरोबर महसूल विभागातर्फे विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. महिला व पुरुष गटांकरिता कबड्डी सामन्यांचे देखील आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी देवीदास इलमकर, अर्जुनी मोरगावचे तहसीलदार बोंबार्डे, नायब तहसीलदार एन.एस. गावड आदी मान्यवर उपस्थित होते. मार्गदर्शन शिबिरात विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन देखील करण्यात आले. कृषीविषयक मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी तुमडाम यांनी केले. पंचायत समितीतर्फे जाधव यांनी मार्गदर्शन केले. भूमि अभिलेख विभाग, पशुसंवर्धन विभाग, समाजकल्याण विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, वनविभागातर्फेदेखील मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणेदार सुनील पाटील यांनी मांडले. संचालन पो. उपनिरीक्षक पाटील यांनी केले. आभार डॉ.आनंद कुकडे यांनी मानले. शनिवारी (दि.२३) विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. (वार्ताहर)