जवाहरलाल नेहरू हे आधुनिक भारताचे शिल्पकार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:22 AM2021-05-29T04:22:37+5:302021-05-29T04:22:37+5:30

अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. एन. डी. किरसान होते. याप्रसंगी डॉ. किरसान यांनी, पंडित नेहरू हे आधुनिक भारताचे शिल्पकार ...

Jawaharlal Nehru is the sculptor of modern India. | जवाहरलाल नेहरू हे आधुनिक भारताचे शिल्पकार ()

जवाहरलाल नेहरू हे आधुनिक भारताचे शिल्पकार ()

Next

अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. एन. डी. किरसान होते. याप्रसंगी डॉ. किरसान यांनी, पंडित नेहरू हे आधुनिक भारताचे शिल्पकार असून, त्यांनी सार्वजनिक क्षेत्रात अनेक उद्योगाची स्थापना करून औद्योगिक क्रांती घडवून आणली व देशातील युवकांना रोजगार मिळवून देण्याचे फार मोलाचे कार्य केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिष्ठा वाढविण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांनी अमेरिका, त्या वेळच्या रशिया या बलाढय राष्ट्रांना मात देण्यासाठी गुटनिरपेक्ष राष्ट्रांच्या संघाला चालना देण्याचे महत्त्वाचे कार्य आंतरराष्ट्रीय पातळीवर केले, असे सांगितले. दरम्यान, इंदिरा गांधी स्टेडियमजवळील नेहरू चौकात पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याला उपस्थितांनी माल्यार्पण करून नमन केले. याप्रसंगी काँग्रेस प्रदेश सचिव विनोद जैन, सोशल मीडिया अध्यक्ष ॲड. योगेश अग्रवाल, शहर अध्यक्ष जहीर अहमद, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष परवेज बेग, पप्पू पटले, शैलेश जायस्वाल, पवन नागदवने, राजेंद्र दुबे, मंथन नंदेश्वर, पंकज पिल्ले व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Jawaharlal Nehru is the sculptor of modern India.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.