जलयुक्त अभियानाला जेसीबींची ताकद

By admin | Published: June 20, 2015 01:35 AM2015-06-20T01:35:34+5:302015-06-20T01:35:34+5:30

राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यातील जलस्त्रोतांचा विकास करण्यासाठी पुढाकार घेत जलयुक्त शिवार अभियान सुरू केले.

JCB strength of Water Works | जलयुक्त अभियानाला जेसीबींची ताकद

जलयुक्त अभियानाला जेसीबींची ताकद

Next

८० टक्के टार्गेट पूर्ण : तलावांमधील जलसाठ्याची क्षमता वाढली
५गोंदिया : राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यातील जलस्त्रोतांचा विकास करण्यासाठी पुढाकार घेत जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. त्यात गोंदिया जिल्ह्याने आपले लक्ष्य पूर्ण करण्यात आघाडी घेतली असून अतिशय कमी कालावधीत अनेक तलावांचे खोलीकरण करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. यात अदानी फाऊंडेशनने नि:शुल्क पुरविलेल्या जेसीबी मशिन्सची ताकद सर्वाधिक उपयोगी ठरल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून एकूण २२४ कामे प्रस्तावित होती. अवघ्या दोन महिन्याच्या कालावधीत ही कामे ८० टक्के पूर्ण झाली आहेत. त्यात तलावांचे खोलीकरण आणि नाल्यांचे खालीकरण करण्यासोबत विविध विभागांकडून इतरही कामे करण्यात आली. अजूनही ही कामे सुरूच असून त्यामुळे जलस्त्रोत अधिक सक्षम होणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: JCB strength of Water Works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.