जेठभावडा ग्रामपंचायत व शाळेला आयएसओ मानांकन

By admin | Published: December 10, 2015 02:02 AM2015-12-10T02:02:06+5:302015-12-10T02:02:06+5:30

देवरीसारख्या नक्षलप्रभावित आणि दुर्गम क्षेत्रातील जेठभावडा ग्रामपंचायत आणि तेथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा विदर्भातील पहिली...

Jestavada Gram Panchayat and the school has ISO standards | जेठभावडा ग्रामपंचायत व शाळेला आयएसओ मानांकन

जेठभावडा ग्रामपंचायत व शाळेला आयएसओ मानांकन

Next

विदर्भातील पहिली : जिल्हा परिषदेच्या शाळेचा असाही बहुमान
देवरी : देवरीसारख्या नक्षलप्रभावित आणि दुर्गम क्षेत्रातील जेठभावडा ग्रामपंचायत आणि तेथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा विदर्भातील पहिली आयएसओ मानांकित मानांकित शाळा ठरली आहे. या शाळेला सदर बहुमानाचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
ग्राम पंचायत जेठभावडा ही मागील बऱ्याच वर्षापासून वेगवेगळ्या शासनाच्या स्पर्धेत सहभाग घेत आहे. हे गाव अतिदुर्गम आणि नक्षल्यांच्या प्रभावक्षेत्रात आहे. विशेष म्हणजे १०० टक्के आदिवासी समाज असणाऱ्या या गावात सन २००६-०७ या वर्षी जलस्वराज्य प्रकल्प यशस्वीरित्या राबविण्यात आला होता. २००७ मध्ये निर्मल ग्राम योजनेमार्फत १०० टक्के हागणदारीमुक्त गाव म्हणून या गावाला तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या हस्ते ग्रामपंचायतला २ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले होते. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये दोन वेळा तालुकास्तरावर प्रथम तर सन २०१३-१४ मध्ये जिल्हास्तरावर या ग्रामपंचायतला तृतीय पुरस्कार मिळाला आहे.
विविध उपक्रम राबवत असताना गावचे सरपंच डॉ.जे.टी.रहांगडाले हे खूप हिरीरीने भाग घेत असतात. उपसरपंच भोजराज गावडकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर गावडकर, पोलीस पाटील राजेंद्र गावडकर, ग्रा.पं.सदस्य गोपाल कुंभरे, किरसान, शिला गावडकर, कल्पना गावडकर, शहारे तसे चपराशी व शाळेचे मुख्याध्यापक किशोर गर्जे, विनोद मेश्राम, सदस्य अशोक धानगुण, छाया धुर्वे, कांता देहारी, भागवत धानगुन व इतर ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हे उपक्रम राबविले जात आहेत. आयएसओ मानांकनामुळे ग्रामपंचायत व शाळेच्या उपक्रमांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

उपक्रमशील शाळा आणि शिक्षक
येथे असणारी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा ही १ ते ४ वर्गापर्यंत असून त्यात शिकणारे २८ विद्यार्थी १०० टक्के आदिवासी आहेत. या शाळेला मागील काही वर्षात शासनाचे वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये सन २००५-०६ व २००७-०८ मध्ये साने गुरूजी तालुकास्तरिय प्रथम पुरस्कार, तसेच सन २०१३-१४ गाशाआशा तालुकास्तरीय प्रथम तर सन २०१३-१४ मध्ये जिल्हास्तरीय साने गुरूजी प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
जिल्ह्यातील ही पहिली वीज बिल मुक्त शाळा असून येथे सौर उर्जेचा व पवन चक्कीचा वापर करून शाळेसाठी लागणारी वीज तयार केली जाते. सहशालेय उपक्रमात वनराई बंधारे, रक्तदान शिबिर, अंधश्रध्दा निर्मूलन असे विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविले जातात. शाळेत व ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने शाळेत आता सुसज्ज असे बांधकाम केले जात आहे.

प्रत्येक उपक्रमात गावकऱ्यांचा पुढाकार
गावामध्ये अशा शासकीय स्पर्धा, योजनांमध्ये केवळ लोकसहभाग नसतो तर लोक श्रमदान सुद्धा करतात. १०० टक्के आधार कार्ड नोंदणी झालेले हे गाव आहे. सन २०१४-१५ या वर्षी सामाजिक वनीकरणामार्फत वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन यामध्ये सर्वात जास्त झाडे जोपासणे यामध्ये विदर्भात प्रथम क्रमांक मिळालेला आहे.
गावामध्ये ग्रामपंचायत व शाळेच्या सहकार्याने गावातच जातीचे प्रमाणपत्र वाटप करणे, अशी अनेक कामे ग्रामपंचायतद्वारे राबविल्या जातात. आता ग्रामपंचायत व शाळेने आयएसओ मानांकनातून नवीन मानाचा तुरा रोखला आहे.

Web Title: Jestavada Gram Panchayat and the school has ISO standards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.