भाजप सरकारला फक्त भाषण देण्याचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:25 AM2018-09-26T00:25:37+5:302018-09-26T00:26:25+5:30
राफेल विमान खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा पुढे येत आहे. दरवर्षी २ कोटी नोकरी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, लोकांच्या खात्यात १५ लाख रूपये यासारखे कित्येक आश्वासन भाजप सरकारने दिले. मात्र त्यांची पूर्तता अद्याप झालेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राफेल विमान खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा पुढे येत आहे. दरवर्षी २ कोटी नोकरी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, लोकांच्या खात्यात १५ लाख रूपये यासारखे कित्येक आश्वासन भाजप सरकारने दिले. मात्र त्यांची पूर्तता अद्याप झालेली नाही. मागील ४ वर्षांपासून भाजप सरकार केवळ भाषण देण्याचे काम करीत असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
तालुक्यातील ग्राम सोनबिहरी येथे १.२८ कोटी रूपयांच्या निधीतून मंजूर सोनबिहरी-बलमाटोला रस्ता डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
अग्रवाल म्हणाले, क्षेत्रातील कृषी विकासाला प्राधान्य देत बाघ सिंचन प्रकल्पातील कालव्यांचे मोठ्या प्रमाणात खोलीकरण व दुरूस्ती काम करण्यात आले आहे. यंदा शेवटच्या टोकापर्यंत भरपूर सिंचन सुविधा मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगीतले. जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले यांनी, आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यातील फक्त गोंदिया तालुक्याला हेल्थ वेलनेस योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व ५६ आरोग्य उपकेंद्रात एक आयुर्वेदीक चिकीत्सक नियुक्त होणार असून दररोज २० घरांना त्यांना भेट द्यावी लागणार असल्याचे सांगीतले.
याप्रसंगी जिल्हा परिषद सभापती लता दोनोडे, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभपती चमन बिसेन, विमल नागपुरे, विनिता टेंभरे, मिना चोखांद्रे, कृपाल लिल्हारे, नमिता शहारे, अनिल डोंगरे, जयचंद डहारे, व्यंकटराव मेश्राम, गजेंद्र बोहने, राजकुमार मेश्राम, सिद्धार्थ मेश्राम, रविंद्र लिल्हारे, दुर्गेश लिल्हारे, झाडूदास लिल्हारे, तुलसीबाई बोहने, पुष्पा लिल्हारे, मिरा नागपुरे, मनोहर लिल्हारे, गिरजाशंकर बिरनवार यांच्यासह मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते.