संयुक्त वन व्यवस्थापन समिती (वनदिन)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:30 AM2021-03-23T04:30:46+5:302021-03-23T04:30:46+5:30
कार्यक्रमाला संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, समितीचे सचिव सह वनक्षेत्राधिकारी एम.आर. चौधरी, ...
कार्यक्रमाला संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, समितीचे सचिव सह वनक्षेत्राधिकारी एम.आर. चौधरी, सदस्य खुशाल काशिवार, सतीश कोसरकर, शीतल राऊत, अनिशा पठाण, ललिता गहाणे प्रामुख्याने उपस्थित होते. संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्यावतीने जागतिक वन दिनाचे महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामस्थांकडून जळण्यासाठी लाकडांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने समितीकडून १०० टक्के एलपीजी गॅस कनेक्शन वाटप करण्याकरिता अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास प्रवर्गनिहाय यादी तयार करून सादर करण्यात येणार आहे. मानव व वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना, वन वणवा लागण्याची कारणे व आग प्रतिबंधक उपाययोजना यावर मार्गदर्शन करण्यात आले. जागतिक वन दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सदस्य व गावकरी उपस्थित होते.