पत्रकार हा जनता व शासनातील महत्त्वपूर्ण दुवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 12:31 AM2018-09-09T00:31:55+5:302018-09-09T00:32:30+5:30
शासनाच्या लोककल्याणकारी योजना राबवित असताना माध्यमाची भूमिका महत्वाची आहे. सकारात्मकतेने चांगल्या योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यत पोहोचिवण्याचे काम पत्रकाराच्या लेखनीतून होते. म्हणून पत्रकाराला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासनाच्या लोककल्याणकारी योजना राबवित असताना माध्यमाची भूमिका महत्वाची आहे. सकारात्मकतेने चांगल्या योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यत पोहोचिवण्याचे काम पत्रकाराच्या लेखनीतून होते. म्हणून पत्रकाराला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखले जाते. आज ज्या योजना शासन राबवित आहे, त्याचे प्रचार, प्रसार करण्यात माध्यमानी महत्वपूर्ण भूमिका बजावली असून पत्रकार हा जनता व शासनातील महत्वाचा दुवा आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.कांदबरी बलकवडे यांनी केले.
प्रेस ट्रस्ट आॅफ गोंदियाचा तिसरा स्थापना दिन सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता. या वेळी त्या बोलत होत्या. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष अपूर्व मेठी होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे लोकलेखा समितीचे अध्यक्ष व आ.गोपालदास अग्रवाल, जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, माजी जि. प. उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, अदानी प्रकल्पाचे प्रमुख सी.पी.साहू, जि.प.सभापती शैलजा सोनवाने, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, ट्रस्टचे सचिव रवि आर्य, संयोजक संतोष शर्मा उपस्थित होते. कार्यक्र माची सुरु वात दीप प्रज्ज्वलनाने करण्यात आली.
याप्रसंगी स्व. अटल बिहारी वाजपेयी, स्व. कुलिदप नैय्यर, माजी खासदार स्व. केशवराव पारधी, शहीद जवान व केरळ येथील पूरपरिस्थतीत मृत्युमुखी पडलेल्यांना दोन मिनिट मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर जिल्हा गौरव सामाजिक सेवा पुरस्काराने डॉ. देबाशिष चटर्जी, जिल्हा गौरव साहित्यरत्न पुरस्काराने उषाकिरण आत्राम, जिल्हा गौरव कृषीरत्न पुरस्काराने मंदाताई गावडकर व देवेंद्र राऊत, जिल्हा गौरव कर्तव्यनिष्ठ पुरस्काराने डॉ.विजय वानखेडे, जिल्हा गौरव आदर्श शिक्षक पुरस्काराने विनोद गहाणे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तर प्रेस ट्रस्टच्या जीवन गौरव पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार रमेशचंद्र दुबे यांना सन्मानित करण्यात आले.या वेळी ट्रस्टच्या सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
यामध्ये वेदांत मेठी, ओम ताजणे, करिना राऊत, तेजिस्वनी शर्मा यांचा समावेश आहे. उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून प्रेस ट्रस्ट आॅफ गोंदियाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. माध्यमांची भूमिका, कर्तव्य आणि माध्यमांपासून नागरिकांच्या अपेक्षा यावर विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्र माचे संचालन ट्रस्टचे उपाध्यक्ष जयंत शुक्ला, प्रास्ताविक संतोष शर्मा व आभार रवि आर्य यांनी केले. कार्यक्र माच्या यशस्वीतेसाठी हिदायत शेख, राहूल जोशी, अंकुश गुंडावार, कपिल केकत, हरिंद्र मेठी, उदय चक्र धर, दत्तात्रय दलाल, मुकेश शर्मा, आशिष वर्मा, नरेश रहिले, बिरला गणवीर, नरेंद्र सिंद्रामे, जावेद खान, अर्चना गिरी, प्रमोद नागनाथे, भरत घासले, योगेश राऊत, दीपक जोशी, मोहन पवार यांनी सहकार्य केले.
केरळ आपदाग्रस्तांना ११ हजाराची मदत
केरळ येथे आलेल्या पुरामुळे मोठी आपदा निर्माण झाली आहे. अशा वेळी केरळवासीयांना मदत म्हणून ट्रस्टच्या वतीने ११ हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ.कांदबरी बलकवडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.