मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना न्याय द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 12:19 AM2018-11-07T00:19:43+5:302018-11-07T00:21:04+5:30
मागासवर्गीय कर्मचाºयांच्या विविध मागण्या व समस्यांना घेऊन येथील कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्यावतीने शनिवारी (दि.३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. राज्य शासनाने नवीन नियुक्त्यांवर बंधन घातल्याने बेरोजगार आपल्या हक्कापासून वंचित आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या व समस्यांना घेऊन येथील कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्यावतीने शनिवारी (दि.३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
राज्य शासनाने नवीन नियुक्त्यांवर बंधन घातल्याने बेरोजगार आपल्या हक्कापासून वंचित आहेत. या नियुक्तीचा अनुशेष २.३९ लाखावर पोहचला असून पदोन्नतीचा अनुशेष ७८ हजारांवर गेला आहे. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना योग्य ठिकाणी पदस्थापना दिली जात नाही. तसेच खोट्या माहितीच्या आधारे अनेक कर्मचारी पदस्थापना मिळवून शासनाला धोका देत असून शासन त्यांना संरक्षण देत आहेत. शिक्षकांच्या बदली प्रकरणातही अनेकानी खोटी माहिती देवून स्थानांतरण मिळवून घेतले आहे.
अशांना शासन संरक्षण देत असून मागासवर्गीय कर्मचाºयांना न्याय द्यावा अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्यावतीने धरणे आंदोलनातून करण्यात आली.
दरम्यान, मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राजकुमार बडोले यांना पाठविण्यात आले. महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.सतीश बंसोड यांच्या नेतृत्वात आयोजीत या धरणे आंदोलनात सरचिटणीस एस.डी.महाजन, ए.एच.टेंभूर्णीकर, आर.जे.बंसोड, वामन मेश्राम, दिवाकर खोब्रागडे, संजय भास्कर, डी.एच.धुवारे, जिवन खोब्रागडे, धर्मशिल रामटेके, ए.वाय.बोंबार्डे, धनराज रामटेके, दिलीप मेश्राम, सोनाली खरतडे, एम.आर.परिहार, के.एम. केकडे, डी.एस.मेश्राम, ओमप्रकाश वासनिक, संजय उके, राजेश गजभिये, सिद्धार्थ ठवरे, सिद्धार्थ भोतमांगे, विरेंद्र भोवते, ए.ए.बॅनर्जी, विनोद मेश्राम, राजु राहूलकर, प्रकाश वासनिक, किरण फुले, के.टी.गजभिये, इंद्रराज भालाधरे, मिलींद भालधरे यांच्यासह अन्य उपस्थित होते.